प्रशांत किशोर राजकीय धंदेवाईक व्यापारी, जदयूचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:03 AM2022-11-14T09:03:12+5:302022-11-14T09:06:55+5:30

Prashant Kishor: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत: निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळली; परंतु, बिहारसाठी ‘उत्तम पर्याय’ तयार करण्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला.

Prashant Kishor, political businessman, JD(U)'s attack | प्रशांत किशोर राजकीय धंदेवाईक व्यापारी, जदयूचा हल्लाबोल

प्रशांत किशोर राजकीय धंदेवाईक व्यापारी, जदयूचा हल्लाबोल

googlenewsNext

बेतिया : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत: निवडणूक लढविण्याची शक्यता फेटाळली; परंतु, बिहारसाठी ‘उत्तम पर्याय’ तयार करण्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला.
जद (यू) नेत्यांनी प्रशांत किशोर हे थोडीशी राजकीय दृष्टी असलेले धंदेवाईक  (व्यापारी) आहेत, असा आरोप केला होता. त्यावर टीका करताना प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री  नितीशकुमार यांनी मला दोन वर्षे त्यांच्या निवासस्थानी का ठेवले हे त्यांना विचारा, असे आव्हान जदयूच्या नेत्यांना दिले.
निवडणूक रिंगणात उतरण्याची योजना आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘मी निवडणूक का लढवू? मला अशी कोणतीही आकांक्षा नाही,’ असे ते उत्तरले. पश्चिम चंपारणसाठी रविवारी होणाऱ्या जिल्हा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. या अधिवेशनात ‘जन सूराज’ मोहिमेला राजकीय पक्ष बनवायचे की नाही, याबाबत लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
मी जर त्यांच्या राजकीय प्रतिष्ठानात सहभागी झालो तर ते माझ्यावर आनंदाचा वर्षाव करतील. मी स्वतंत्र मार्ग अनुसरल्याने ते आणि त्यांचे पक्षनेते नाराज आहेत, असेही किशोर म्हणाले.

Web Title: Prashant Kishor, political businessman, JD(U)'s attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.