Prashant Kishor : "लालूजींना आपल्या 10 वी फेल मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय पण..."; प्रशांत किशोरांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 06:10 PM2023-02-04T18:10:26+5:302023-02-04T18:15:40+5:30
Prashant Kishor And Lalu Prasad Yadav : "पाच वर्षे जनता शिक्षण आणि रोजगाराच्या समस्यांवर बोलत बसते, पण ज्या दिवशी मतदान होते, त्या दिवशी जनता सर्व काही विसरते."
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या जन सुराज पदयात्रेचा १२६ वा दिवस गोपालगंज येथील गांधी कॉलेज मैदानापासून सुरू झाला. प्रशांत किशोर शेकडो पादचाऱ्यांसह गोपालगंज येथून पायी निघाले. त्यांचा प्रवास भितभेरवा, कोनहुआ, बसडिला खास, इंदरवा अब्दुल्ला, सेमरा, बिदेसी टोला मार्गे पार करत एकडरवा पंचायतीच्या बरगछिया मैदानावर पोहोचला. गोपालगंजमध्ये प्रशांत किशोर यांच्या पदयात्रेचा आज 21 वा दिवस आहे. यावेळी त्यांनी लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि मुलगा तेजस्वी यादव यांची खिल्ली उडवली आहे.
गोपालगंजच्या चैनपट्टी गावात जन सुराज पदयात्रेदरम्यान प्रशांत किशोर यांनी जनतेला सांगितले की, जर तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेतली नाहीत तर जगात कोणीही तुमच्या मुलांची काळजी घेणार नाही. ते म्हणाले की, "पाच वर्षे जनता शिक्षण आणि रोजगाराच्या समस्यांवर बोलत बसते, पण ज्या दिवशी मतदान होते, त्या दिवशी जनता सर्व काही विसरते. जाती-धर्माच्या नावावर मते दिली जातात, हिंदू-मुस्लिम, चीन-पाकिस्तान, पुलवामा यांच्या नावावर मतदान होतं."
गेल्या लोकसभा निवडणुकीची आठवण करून देताना ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी ज्या नेत्याला जनतेकडून शिवीगाळ होत होती, त्या नेत्याला नंतर जनता सर्व काही विसरून मतदान करते. ते म्हणाले की, "लोकांनी मोदीजींच्या नावाने मतदान केले, पाकिस्तान आणि पुलवामाच्या नावाने मतदान केले, जेव्हा तुम्ही पुलवामा आणि पाकिस्तानच्या नावावर मतदान कराल, तेव्हा तुमच्या गावात शाळा कशी बांधली जाईल?"
"लालूजींचा मुलगा दहावी पास झालेला नाही"
"तुझा मुलगा शिकत नाही, तुमच्या घरचे लोक बाहेर काम करतात. लालूजींचा मुलगा दहावी पास झालेला नाही... हे बघा, तरीही लालूजींना आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा याची काळजी वाटत आहे, यात काही अडचण नाही की लालूजींना आपल्या मुलाची काळजी आहे. समस्या अशी आहे की, तुमचा मुलगा दहावी पास झाला आहे, बीए-एमए केले आहे आणि त्याला शिपायाची नोकरीही मिळत नाही आणि तुम्ही अजिबात काळजी करत नाही" असं म्हटलं आहे.
"जाती-धर्माच्या नशेत हरवून गेला आहात"
"तुम्ही जाती-धर्माच्या नशेत हरवून गेला आहात. मुलांची काळजी असती तर ज्याने तुमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली असती त्याला मत दिले असतं" असंही म्हटलं आहे. तसेच तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला हवं, 5 किलो धान्यावर की मुलांच्या शिक्षणावर? असा सवालही प्रशांत किशोर यांनी जनतेला विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"