प्रशांत किशोर नितीश कुमार यांचे सल्लागार नियुक्त
By admin | Published: January 23, 2016 03:34 AM2016-01-23T03:34:34+5:302016-01-23T03:34:34+5:30
राजकारणातील आधुनिक ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे निवडणूक व्यवस्थापनतज्ज्ञ प्रशांत किशोर यांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या
पाटणा : राजकारणातील आधुनिक ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे निवडणूक व्यवस्थापनतज्ज्ञ प्रशांत किशोर यांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेटचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळ समन्वय समितीने गुरुवारी रात्री याबाबतची अधिसूचना जारी केली. योजना व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी प्रशांत किशोर यांना मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे यात म्हटले आहे. नव्या भूमिकेत प्रशांत किशोर योजना आखण्यासोबतच विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची निगराणी करतील. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांना ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता. (वृत्तसंस्था)