शब्द वगळण्याचा प्रकार जाणीवपूर्वक पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली शंका : मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

By Admin | Published: January 30, 2015 09:11 PM2015-01-30T21:11:48+5:302015-01-30T21:11:48+5:30

नागपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

Prashantrao Chavan expresses the type of word skeptics doubt: Modi should clarify the role | शब्द वगळण्याचा प्रकार जाणीवपूर्वक पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली शंका : मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

शब्द वगळण्याचा प्रकार जाणीवपूर्वक पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली शंका : मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

googlenewsNext
गपूर: केंद्र आणि राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने त्यांचा हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबविणे सुरू केले आहे, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. संविधानाच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द वगळणे हा त्यातलाच प्रकार असून तो जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशभरात हिंदुत्वाच्या मुद्दावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काही संघटनांचा प्रयत्न गंभीर आहे. महात्मा गांधी यांच्या खुन्याचे उदात्तीकरण असो किंवा सविधानाच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द वगळणे असो हे त्यातलेच प्रकार आहेत. मुळात घटना बदलविण्याची मानसिकताच भाजपची आहे. त्यामुळे हे शब्द वगळणे ही तांत्रिक चूक वाटत नाही तर तसे जाणीवपूर्वक केले गेले असावे अशी शंका येते. एखादी गोष्ट करून त्याचे काय पडसाद उमटतात याची चाचणी घेण्याचाच ही खेळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात त्यांची भूमिका सष्ट करावी. हिंदुत्वाच्या अजेंड्याला समर्थन असेल तर तसे जाहीर करावे किंवा विरोध असेल तर तो स्पष्ट करावा, असे चव्हाण म्हणाले.
राज्यात पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण केले जात आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत त्यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी बोलणे टाळले (प्रतिनिधी)
चौकट करावी
तर नटराजन यांच्यावर
कारवाई करावी
संविधानाला साक्षी ठेवून मंत्री शपथ घेत असल्याने त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय हे कायद्याच्या चौकटीतच असणे अपेक्षित असते. अशा वेळी कोणाच्या सांगण्यावरून जर मंत्री जयंती नटराजन यांनी निर्णय घेतले असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या आरोपावर दिली. राहुल गांधींवर केलेले आरोपही त्यांनी फेटाळून लावले. राजकीय क्षेत्रात काम करताना एक नेता म्हणून त्यांच्याकडे आलेले पत्र संबंधितांकडे पाठवावे लागते. मात्र त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार हे मंत्र्यांना असतात, असे ते म्हणाले.

Web Title: Prashantrao Chavan expresses the type of word skeptics doubt: Modi should clarify the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.