करणीसेनेच्या धमकीनंतर प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सवातून प्रसून जोशींची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 03:35 PM2018-01-27T15:35:06+5:302018-01-27T15:36:37+5:30
प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सवातून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रशून जोशी यांनी माघार घेतली आहे.
जयपूर- प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सवातून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रशून जोशी यांनी माघार घेतली आहे. पद्मावत सिनेमावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रसून जोशी यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. करणी सेनेकडून हल्ला होण्याची भिती असल्याने त्यांनी प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सव अर्थात जयपूर लिटरेचर फेस्टिवलला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्यिकांच्य या महोत्सवात आपल्यामुळे कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये. तसंच वादावर लक्ष केंद्रीत राहण्यापेक्षा महोत्सवातील नवनिर्मितीवर लक्ष केंद्रीत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करत प्रसून जोशी यांनी जयपूर साहित्य महोत्सवातून माघार घेतली आहे.
अतिशय जड अंतकरणाने मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या या निर्णयामुळे मला यंदा साहित्य आणि कवितांच्या या गंगेमध्ये डुंबता येणार नाही, याचं मला दुःख होत आहे, असं प्रसून जोशी म्हणाले.
Will not be attending #JLF this year&must say will miss sharing great moments with literature and poetry lovers. I am doing this so that the dignity of the event does not get compromised or discomfort caused either to the organisers, fellow writers or the attendees: Prasoon Joshi pic.twitter.com/TRR3eNbm5R
— ANI (@ANI) January 27, 2018
पद्मावत सिनेमावरुन वाद निर्माण झाल्यानंतरही हा सिनेमा प्रदर्शित करण्याला प्रसून जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं असून माझा निर्णय दोन्ही बाजूंना न्याय देणारा होता. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं, असं पद्मावतला हिरवा झेंडा दाखविण्याच्या निर्णयावर प्रसून जोशी यांनी मत व्यक्त केलं होतं.
राजपूत संघटनांकडून प्रसून जोशी यांना जयपूर साहित्य महोत्सवात सहभागी न होण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करत झेड सुरक्षा प्रदान केली होती. पण, आता प्रसून जोशी यांनी या महोत्सवाला हजेरीच न लावण्याचा निर्णय घेतला आहे.