“PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 08:09 PM2021-08-27T20:09:33+5:302021-08-27T20:11:31+5:30

प्रवीण तोगडिया यांनी भाजपच्या अनेक धोरणांवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळाले आहे.

pravin togadia criticized pm narendra modi and bjp | “PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला

“PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला

Next

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजप आणि या संघटनेपासून फारकत घेतली आहे. विश्व हिंदू परिषदेपासून वेगळे झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नावाची वेगळी संघटना स्थापन केली. यानंतर प्रवीण तोगडिया यांनी भाजपच्या अनेक धोरणांवर टीकास्त्र सोडताना पाहायला मिळाले आहे. याच प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली असून, पंतप्रधाननरेंद्र मोदी बाजूला बसतच नाहीत, बसले तर समजवू शकतो ना, असा टोला लगावला आहे. (pravin togadia criticized pm narendra modi and bjp) 

“१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बाजूला बसतच नाही. बसले तर समजवू शकतो ना. त्यांना राम मंदिरच्या सुरुवातीला बाबरी मशिदीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो. मात्र राम मंदिरासाठी लढणारा प्रवीण तोगडिया आवडत नाही. त्यांना आजूबाजूच्या बाबूंनी बिघडवले. ते खूप चांगले व्यक्ती होते, अशी टीका तोगडिया यांनी केली आहे. 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र

एक कोटी रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत

भारताचे इकॉनॉमिक मॉडेल बदलावे लागेल. आता आपला जीडीपी खाली आला आहे. तो वाढत होता. एक टक्का जीडीपी वाढला, तर एक कोटी रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. भारतात जे मॉडेल आहे. एक टक्का जीडीपी वाढताच एक कोटी रोजगार तयार होत नाहीत. ही जॉबलेस ग्रोथ आहे. जीडीपी वाढतो तेव्हा सरकारच्या कराच्या माध्यमातून मिळकत वाढते, असे प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे.  

डिसेंबरपर्यंत RBI आणणार स्वतःची क्रिप्टोकरन्सी!; शक्तिकांत दास यांचे संकेत

दरम्यान, अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहत आहे. मात्र, या राम मंदिराच्या शिलान्यासावेळी या प्रवीण तोगडिया यांचा पंतप्रधान मोदी यांना विसर पडला, असे शल्य प्रवीण तोगडिया यांनी बोलून दाखवले. 
 

Web Title: pravin togadia criticized pm narendra modi and bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.