प्रवीण तोगडिया गुजरातच्या रुग्णालयात बेशुद्धावस्थेत, उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 10:16 PM2018-01-15T22:16:34+5:302018-01-15T22:21:32+5:30

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया येथील शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Pravin Togadia in Gujarat hospital, unconsciously started treatment | प्रवीण तोगडिया गुजरातच्या रुग्णालयात बेशुद्धावस्थेत, उपचार सुरु

प्रवीण तोगडिया गुजरातच्या रुग्णालयात बेशुद्धावस्थेत, उपचार सुरु

Next

अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया येथील शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील चंद्रमणी रुग्णालयात प्रवीण तोगडिया त्यांचावर उपचार सुरु आहेत. सकाळपासून प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी चार पथके कामाला लावली होती. सोमवारी संध्याकाळपर्यंत तोगडिया यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. मात्र, रात्रीच्या सुमारास ते अहमदाबादमधील शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
राजस्थान पोलीस प्रवीण तोगडिया यांना पकडून घेऊन गेले, असे विहिंपने म्हटले होते. मात्र सह पोलीस आयुक्त (गुन्हे) जे. के. भट्ट यांनी त्याचा इन्कार केला. आम्ही किंवा राजस्थान पोलिसांनी तोगडिया यांना पकडलेले नाही. ते ‘बेपत्ता’ आहेत व त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके स्थापन केली आहेत, असे त्यांनी सांगितले होते. भट्ट म्हणाले की, राजस्थानमधील एका खटल्यातील अटक वॉरन्ट घेऊन तेथील पोलीस आले होते. आमचे पोलीस त्यांच्यासोबत तोगडिया यांच्या घरी व विहिंपच्या कार्यालयात गेले. पण दोन्ही ठिकाणी ते सापडले नाहीत.
सह पोलीस आयुक्तांनी असेही सांगितले की, तोगडिया यांना ‘झेड’ सुरक्षा आहे. परंतु सोमवारी सकाळी ते सुरक्षा रक्षक सोबत न घेताच एका दाढीवाल्या माणसासोबत विहिंप कार्यालयातून बाहेर पडले व रिक्षेत बसून गेले अशी माहिती मिळाली. पण ते नेमके कुठे गेले किंवा कुठे आहेत याची माहिती नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असून आम्ही विहिंपवाल्यांशी सतत संपर्कात आहोत.
 

Web Title: Pravin Togadia in Gujarat hospital, unconsciously started treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.