'मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर निव्वळ पब्लिसिटी स्टंट'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 09:19 AM2019-01-22T09:19:14+5:302019-01-22T09:32:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून आपण चहा विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला होता असे सांगतात. मात्र मोदींनी कधीच चहा विकला नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून आपण चहा विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला होता असे सांगतात. मात्र मोदींनी कधीच चहा विकला नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर माझी 43 वर्ष मैत्री होती. पण मी त्यांना कधी चहा विकताना पाहिले नाही. फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचं तोगडिया यांनी म्हटलं आहे.
प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन आरएसएस आणि भाजपावर जोरदार टीका केली. आरएसएस आणि भाजपाला राम मंदिर बांधायचे नाही असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर आरएसएसचे नेते भय्याजी जोशी यांनी पुढच्या पाच वर्षात राम मंदिर बांधले जाणार नाही असे म्हटल्याचे तोगडिया म्हणाले. दोन्ही संघटनांनी देशातील लोकांना अंधारात ठेवले होते. मात्र आता या देशातील हिंदू जागे झाले असून 9 फेब्रुवारीला हिंदुंच्या नव्या पक्षाची घोषणा होईल. संसदेत एकदा पक्षाला विजय मिळाला की, दुसऱ्याच दिवशी मंदिराचे बांधकाम सुरू होईल असे तोगाडिया म्हणाले आहेत. मोदी संसदेत तिहेरी तलाकसाठी कायदा करतात पण राम मंदिराच्या मुद्यावर ते असा प्रयत्न करताना दिसत नाहीत अशी टीका प्रवीण तोगडिया यांनी मोदींवर केली आहे.