शाब्बास पोरा! पंक्चरवाल्याचा मुलगा कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:43 PM2023-09-14T13:43:05+5:302023-09-14T13:50:37+5:30

पहिल्याच प्रयत्नात अहद यांनी हे यश मिळवलं,तेही कोणत्याही कोचिंगशिवाय. सेल्फ स्टडी करून त्यांनी हे घवघवीत यश मिळवलं. 

prayagraj puncture mechanic son ahad ahmed crack up pcs j result scored 157th rank | शाब्बास पोरा! पंक्चरवाल्याचा मुलगा कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश

शाब्बास पोरा! पंक्चरवाल्याचा मुलगा कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश

googlenewsNext

अहद अहमद यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे.  अहद काही वर्षांपूर्वीपर्यंत वडिलांसोबत सायकल दुरुस्त करायचे. कधी कधी ते आईला कपडे शिवण्यासाठी मदत करत असे. आज ते न्यायाधीश झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्याच प्रयत्नात अहद यांनी हे यश मिळवलं,तेही कोणत्याही कोचिंगशिवाय. सेल्फ स्टडी करून त्यांनी हे घवघवीत यश मिळवलं. 

पंक्चरवाल्याच्या मुलाच्या यशाने प्रयागराजमधील लोक खूश झाले आहेत. त्याच्या यशाचा आनंद साजरा केला जात आहे. अहद आणि त्यांच्या कुटुंबाचं खास अभिनंदन करत आहे. अहद अहमद हा प्रयागराज शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाबगंज भागातील बरई हरख या छोट्याशा गावचे रहिवासी आहेत. गावात त्यांचं एक छोटेसं मोडकळीस आलेलं घर आहे. 

घराशेजारी वडील शहजाद अहमद यांचे सायकल पंक्चरचे छोटेसे दुकान आहे. या दुकानात ते मुलांसाठी टॉफी आणि चिप्सही विकतात. हे दुकान अजूनही चालतं. गेल्या काही वर्षांपासून अहद कधी कधी वडिलांच्या कामात मदत करतात. अहदच्या यशालाही महत्त्व आहे कारण सायकल दुरुस्त करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या त्याच्या वडिलांनी रात्रंदिवस मेहनत करून त्यांना शिकवलं. आपल्या मुलाला शिक्षित करून यशस्वी व्यक्ती बनवण्याची कल्पना आई अफसाना यांना चित्रपट पाहिल्यानंतर आली. 

हा चित्रपट पाहिल्यानंतरच आईने ठरवलं की आपल्या पतीच्या पंक्चरच्या दुकानातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आणि त्या महिलांचे कपडे शिवून मुलांना शिकवतील. अहद अहमद हे चार भावंडांमध्ये तिसरे आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी अहद यांचे शिक्षण तर केलंच पण इतर मुलांनाही शिकवलं. अहद यांचा मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. लहान भाऊ एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक आहे. 

अहद सांगतात की, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना गरिबी आणि संघर्षात वाढवून इथपर्यंत आणले नाही. प्रामाणिकपणे आणि चांगल्या हेतूने काम करण्याचा सल्ला त्यांनी नेहमीच दिला आहे. आई-वडिलांची ही सूचना ते आयुष्यभर पाळण्याचा प्रयत्न करतील. अहद यांच्या म्हणण्यानुसार, ते एका पंक्चरवाल्याचा मुलगा आहेत हे सांगण्यास अजिबात संकोच वाटत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: prayagraj puncture mechanic son ahad ahmed crack up pcs j result scored 157th rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.