पावसासाठी मुस्लीम बांधवांची शिर्डीत नमाज व दुवा
By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:58+5:302015-09-04T22:45:58+5:30
शिर्डी-राज्यातील दुष्काळी परिस्थिती कामयची दुर व्हावी तसेच भरपुर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी आज शिर्डीत मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज पठण करुन दुवा मागण्यात आली.अत्यंत आर्ततेने मुस्लीम बांधवांनी पावसाकरता अल्लाहकडे दुवा मागितली.पावसाकरता सलग तीन दिवस नमाज पठण करण्यात येणार असल्याचे यावेळी मौलाना असगरअली यांनी सांगितले़
Next
श र्डी-राज्यातील दुष्काळी परिस्थिती कामयची दुर व्हावी तसेच भरपुर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी आज शिर्डीत मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज पठण करुन दुवा मागण्यात आली.अत्यंत आर्ततेने मुस्लीम बांधवांनी पावसाकरता अल्लाहकडे दुवा मागितली.पावसाकरता सलग तीन दिवस नमाज पठण करण्यात येणार असल्याचे यावेळी मौलाना असगरअली यांनी सांगितले़आज दुपारी जुम्माच्या नमाज नंतर ईदगाह मैदानावर सर्व मुस्लीम बांधवांच्या वतीने नमाज व दुवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार शहरातील तमाम मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर मौलाना असगरअली यांच्या मार्गदशर्नाखाली दोन रकात नमाज पठण करुन अर्धातास साश्रुनयांनी अल्लाहकडे दुवा मागितली.राज्यात सर्वत्र पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थीती निर्माण झाली असुन पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.शेतातील पिके पाण्या अभावी जळुन केली.जनावरांना चारा नाही.पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे जनावरांची भटकंती होत आहे.ही सर्व परिस्थीतीमुळे सर्वजण हवालदिल झाले असुन तमाम जनतेकडुन झालेल्या कळत नकळत चुका पदरात घेउन आम्हाला माफ करावे अशी मागणी करत परमेश्वरा आम्हाला पाण्याची भिक घाला अशी विनवणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.सलग तिन दिवस पावसासाठी नमाज पठण करुन दुवा मागावी असे आवाहन यावेळी नगरसेवक मौलाना असगरअली यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)--------------------------------------------------------------------0409-2015-साई-04 पावसासाठी मुस्लीमाचे साकडे,जेपीजे