देशभरातून प्रार्थना... 'चंद्रयान ३' च्या यशस्वी लँडिंगसाठी बाबा रामदेवांचा यज्ञ सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:32 PM2023-08-23T12:32:11+5:302023-08-23T12:34:45+5:30
भारताच्या चंद्रयान ३ च्या शसस्व लँडिंगसाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपची अंतराळ संस्था इसा इस्त्रोच्या मदतीला धावल्या आहेत.
हरीद्वार - भारतासाठीच नव्हे तर जगासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. चंद्रयान ३ आज चंद्राच्या काळोख्या बाजुला उतरत आहे, ही जागा जगापासून लपून राहिलेली आहे. भारतासह अन्य देशांनी आजवर पृथ्वीकडील प्रकाशमान भागावरच यान उतरविलेली आहेत. अशातच चंद्रयान २ चे अपयश आणि परवाच रशियाच्या लुना २५ चे अपयश यामुळे सर्वांच्या मनात धाकधुक आहे. त्या पार्श्वभुमीवर शास्त्रज्ञ सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तर, देशावासीय प्रार्थना करत आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आणि चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगसाठी यज्ञ सुरू केले आहे.
भारताच्या चंद्रयान ३ च्या शसस्व लँडिंगसाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपची अंतराळ संस्था इसा इस्त्रोच्या मदतीला धावल्या आहेत. चंद्रयान -३ आज सायंकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. जेव्हापासून चंद्रयान- अवकाशात झेपावले आहे, तेव्हापासून या दोन्ही एजन्सी भारताला ट्रॅकिंगसाठी मदत करत आहेत. आजही नासा लँडिंगवेळी इस्त्रोला मदत करणार आहे. शास्त्रीय पातळीवर संसोधन संस्थांकडून योग्य ती खबरदारी आणि प्रयत्न सुरू आहेत. तर, देशवासीयांनाही या मोहिमेचं कुतूहल असून कोट्यवधी भारतीयांची प्रार्थना सुरू आहे.
#WATCH | Uttarakhand: Yog Guru Ramdev performs puja in Haridwar for the success of the Chandrayaan-3 mission. pic.twitter.com/JkYK6xe1Fb
— ANI (@ANI) August 23, 2023
परमार्थ निकेतन येथे विशेष गंगा आरती करण्यात आली आहे. स्वामी चिदानंद सरस्वती, परमार्थ गुरुकुलचे ऋषिकुमार आणि श्रद्धाळूंनी गंगा मातेचा अभिषेक करुन चंद्रयान ३ च्या सुरक्षित लँडिंगसाठी प्रार्थना केली आहे. सर्वांनीच यज्ञात आहुती समर्पित केली. तर, बाबा रामदेव यांनीही यज्ञ सुरू केले आहे. रामदेव यांनी हरीद्वार येथे पूजा आणि यज्ञ सुरु केला आहे.
भारत जगातील पहिला देश
चंद्रयान 3 आज इतिहास रचणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने म्हटले आहे की, चंद्रयान-3 मोहीम वेळापत्रकानुसार आहे आणि आज बुधवारी सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंगसाठी सुरळीतपणे प्रगती करत आहे. चंद्रावर उतरल्यानंतर, भारत असे करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनेल. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे