आधी मुलं होऊ द्यायचं आणि नंतर विवाह करायचा, राजस्थानातील गरासिया नावाच्या जमातीची अजब प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:30 AM2017-10-22T01:30:41+5:302017-10-22T01:30:45+5:30
विवाह न करता स्त्री व पुरुषाने एकत्र राहण्याचा प्रकार भारतीय समाजाला पचनी पडलेला नाही. पण राजस्थानातील गरासिया नावाच्या जमातीत ही पद्धत पूर्वापार आहे.
विवाह न करता स्त्री व पुरुषाने एकत्र राहण्याचा प्रकार भारतीय समाजाला पचनी पडलेला नाही. पण राजस्थानातील गरासिया नावाच्या जमातीत ही पद्धत पूर्वापार आहे. तरुण व तरुणी हे पळून जातात आणि मुलं झालं की परत येतात. ते परत आले की मग त्यांचा विवाह लावून दिला जातो. किंबहुना मुलं होणं ही विवाहाची अटच असते. राजस्थान व गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये या जमातीची वस्ती आहे. या जमातीत विवाह मेळा लागतो. तिथं तरुण व तरुणी भेटतात आणि पळून जातात. फार वर्षांपूर्वी या जमातीतील चारपैकी तिघा भावांची विवाह झाले. पण त्यांना मुलं झाली नाही. याउलट एका भावानं विवाह केला नाही. तो एका स्त्रीबरोबर राहत असे. त्याला मात्र मुलं झाली. तेव्हापासून आधी मुलं होऊ द्यायचं आणि नंतर विवाह करायचा, अशी प्रथा सुरू झाली, असे सांगतात.