पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार वानखेडे सोसायटीजवळील घटना : तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

By Admin | Published: June 21, 2016 10:12 PM2016-06-21T22:12:53+5:302016-06-21T22:12:53+5:30

जळगाव : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात तिघांनी एकास, धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वानखेडे सोसायटीजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरुपाच्या गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.

Pre-emptive murder case: Wardkheda society warrants killings against three people: Unlawful | पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार वानखेडे सोसायटीजवळील घटना : तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

पूर्ववैमनस्यातून एकावर धारदार शस्त्राने वार वानखेडे सोसायटीजवळील घटना : तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

googlenewsNext
गाव : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात तिघांनी एकास, धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वानखेडे सोसायटीजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरुपाच्या गुन्‘ाची नोंद करण्यात आली आहे.
राहुल कांतीलाल सोनवणे (वय २५, रा.आंबेडकरनगर, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल सोनवणे याच्या भावाशी संशयित आरोपी सतीश मिलिंद गायकवाड, पप्पू मिलिंद गायकवाड व सचिन दशरथ सैंदाणे (तिघे रा.आंबेडकरनगर, जळगाव) यांचे भांडण झालेले होते. याच भांडणाच्या कारणावरून मंगळवारी वाद झाल्याने संशयितांनी दुखापत केली, असे राहुल याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

Web Title: Pre-emptive murder case: Wardkheda society warrants killings against three people: Unlawful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.