प्रीती रजक बनल्या लष्करातील पहिल्या सुभेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 10:01 AM2024-01-28T10:01:54+5:302024-01-28T10:03:05+5:30

Indian Army: ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत. रजक यांनी डिसेंबर २०२२मध्ये लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिस दलात रुजू झाल्या. 

Preeti Rajak became the first Subhadar in the Army | प्रीती रजक बनल्या लष्करातील पहिल्या सुभेदार

प्रीती रजक बनल्या लष्करातील पहिल्या सुभेदार

नवी दिल्ली - ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत. रजक यांनी डिसेंबर २०२२मध्ये लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी पोलिस दलात रुजू झाल्या. 
 रजक या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनणे हा भारतीय लष्कर तसेच देशातील महिलांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नारीशक्तीचे सामर्थ्य पदोपदी दिसते. शूटिंग स्पर्धांमध्ये रजक यांनी कौशल्य दाखवून पुरस्कार मिळविले होते. त्यावेळी त्या लष्करात हवालदार पदावर कार्यरत होत्या. चीनमध्ये झालेल्या १९व्या एशियन गेम्समध्ये रजक यांनी ट्रॅप वूमन टीम इव्हेन्टमध्ये चंदेरी पदक मिळविले होते. 

Web Title: Preeti Rajak became the first Subhadar in the Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.