Preeti Sudan : UPSC ची धुरा निवृत्त IAS अधिकाऱ्याकडे! प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:57 PM2024-07-31T13:57:48+5:302024-07-31T13:59:30+5:30

Preeti Sudan : निवृत्त आयएएस अधिकारी प्रीती सुदान यांना प्रशासकीय कामाचा जवळपास ३७ वर्षांचा अनुभव आहे.

Preeti Sudan, former union health secretary, appointed as UPSC chairperson | Preeti Sudan : UPSC ची धुरा निवृत्त IAS अधिकाऱ्याकडे! प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Preeti Sudan : UPSC ची धुरा निवृत्त IAS अधिकाऱ्याकडे! प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

Preeti Sudan : नवी दिल्ली : निवृत्त आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान गुरुवार एक ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. प्रीती सुदान जुलै २०२० मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव पदावरून निवृत्त झाल्या होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये काम केलं आहे. 

निवृत्त आयएएस अधिकारी प्रीती सुदान यांना प्रशासकीय कामाचा जवळपास ३७ वर्षांचा अनुभव आहे.  प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या १९८३ च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती कलम ३१६अ अंतर्गत करण्यात आली आहे. त्यांनी यूपीएससी सदस्य म्हणूनही काम केलं आहे. आता त्या एप्रिल २०२५ पर्यंत  यूपीएससीच्या अध्यक्षपदी राहतील.

प्रीती सुदान यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात एम.फिल आणि सामाजिक धोरण व नियोजनात एमएससी केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये संपला होता. त्यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिव म्हणून तसंच महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयात काम केलं आहे.

आंध्र प्रदेशमध्ये त्या वित्त, नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि कृषी या खात्यांच्या प्रभारी होत्या. प्रीती सुदान यांनी जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत योजनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ई-सिगारेटवर बंदी घालण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.  तसंच, प्रीती सुदान यांनी जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.

यूपीएससीमध्ये किती सदस्य आहेत?
गेल्या काही दिवसांपूर्वी यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांनी वैयक्तिक कारण पुढे करत राजीनामा दिला होता. यानंतर आता  प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, यूपीएससीमध्ये एक अध्यक्ष असतात आणि जास्तीत जास्त दहा सदस्य असू शकतात. तसंच, आयोगात सध्या चार सदस्यांची पदं रिक्त आहेत.

Web Title: Preeti Sudan, former union health secretary, appointed as UPSC chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.