Janani Suraksha Yojana: गर्भवती महिलांना केंद्राच्या योजनेतून मिळतात ६ हजार रुपये, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 02:42 PM2022-12-04T14:42:26+5:302022-12-04T14:42:53+5:30

Janani Suraksha Yojana : देशातील सर्व घटकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकार अनेक योजना राबवत असतं. अगदी नवजात बालकांपासून ते वृद्धांसाठी योजना भारत सरकारनं सुरू केल्या आहेत.

Pregnant women are getting 6000 rupees under Janani Suraksha scheme | Janani Suraksha Yojana: गर्भवती महिलांना केंद्राच्या योजनेतून मिळतात ६ हजार रुपये, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

Janani Suraksha Yojana: गर्भवती महिलांना केंद्राच्या योजनेतून मिळतात ६ हजार रुपये, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

googlenewsNext

Janani Suraksha Yojana : देशातील सर्व घटकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकार अनेक योजना राबवत असतं. अगदी नवजात बालकांपासून ते वृद्धांसाठी योजना भारत सरकारनं सुरू केल्या आहेत. या योजनांतर्गत लोकांना सरकारकडून व्याज स्वरूपात किंवा थेट मार्गाने आर्थिक मदत दिली जाते. सरकारनं गरोदर महिला (महिला योजना) आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी एक योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर ६ हजार रुपये पाठवले जातात.

जननी सुरक्षा योजनेंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गरोदर महिलांची योग्य प्रसूतीसाठी सरकार शहरी महिलांना १ हजार रुपये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना १,४०० रुपयांची आर्थिक मदत पुरवते. या योजनेसाठी दरवर्षी सुमारे १६०० कोटी रुपयांचे बजेट तयार केलं जातं. १९ वर्षे किंवा त्यावरील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

लहान मुलांना आर्थिक सुरक्षा आणि पुरेसे पोषण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रसूतीनंतर गर्भवती महिलांना आर्थिक मदत दिली जाते. जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना लाभ दिला जातो. या योजनेत सरकारी आरोग्य संस्था आणि सरकारनं प्रमाणित केलेल्या खासगी रुग्णालयांचा समावेश होतो. याशिवाय इतर कोणत्याही रुग्णालयात प्रसूती झाल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याच वेळी, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान अंतर्गत (Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan) प्रसूतीची तपासणी खासगी किंवा सरकारी रुग्णालयात (Private and Government Hospital) दर महिन्याला १ ते ९ तारखेदरम्यान केली जाऊ शकते.

जननी सुरक्षा योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

  • LPS सह राज्यांसाठी उपयोगी.
  • गर्भवती महिलांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
  • प्रसुतीच्या समस्यांचा मागोवा घेणे.
  • प्रसूतीची तपासणी आणि आई आणि बाळाच्या जन्मानंतरची काळजी.
  • स्त्री आणि सरकार यांच्यात दुवा ठेवणे.
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांना प्राथमिक भूमिका प्रदान करणे.


कोणती कागदपत्र हवीत?

  • अर्जदार महिलेचे वय १९ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • सरकारी हॉस्पिटलने दिलेला जन्म दाखला
  • महिलेचा बँक खाते क्रमांक
  • तुम्हाला ही कागदपत्रे योजनेच्या अर्जासोबत जमा करावी लागतील. हा अर्ज मंजूर झाल्यानंतरच योजनेचा लाभ दिला जाणार आहे.



अर्ज कसा करावा?

  • जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार महिलेला प्रथम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • होम पेजवर तुम्हाला अर्जाचा फॉर्म PDF डाउनलोड करावा लागेल.
  • डाउनलोड केल्यानंतर, फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा जसे: अर्जदाराचे नाव, वडील-पतीचे नाव, वय, लिंग, गर्भधारणेची तारीख इ.
  • आता फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व कागदपत्रांच्या फोटोकॉपी सोबत जोडा.
  • आता फॉर्म तुमच्या खाजगी आरोग्य केंद्रात आणि अंगणवाडी केंद्रात जमा करा.
  • तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.



सर्व माहितीची नोंदणी आणि अद्ययावत करण्याची जबाबदारी आशा कार्यकर्त्यांची असेल आणि ती सर्व गर्भवती महिलांपर्यंत पोहोचवतात. या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, कोणत्याही गर्भवती महिलेला तिच्या ग्रामपंचायतीच्या आशा कार्यकर्त्याला भेटावे लागेल. आशा कार्यकर्त्याच्या अनुपस्थितीत गावप्रमुखाशीही संपर्क साधता येतो.

Web Title: Pregnant women are getting 6000 rupees under Janani Suraksha scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.