कोरोना रिपोर्टसाठी 'तिनं' तब्बल १० तास वाट पाहिली; अखेर दवाखान्याबाहेरच प्रसूती झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 01:50 PM2020-09-06T13:50:44+5:302020-09-06T14:10:45+5:30
कोल्हापूरच्या आजरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
कोल्हापूर: कोरोनाच्या माहामारीचा प्रसार सर्वत्र वेगानं होत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणच्या आरोग्यव्यवस्थेवर ताण आला आहे. अनेकदा कोरोना रिपोर्ट लोकांपर्यंत उशिरा पोहोचतात. त्यामुळे गैरसोयीचा सामना अनेकदा करावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये समोर आला आहे. कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे ठरवण्यात तब्बल दहा तास गेले. प्रसूतीसाठी दवाखानाच उपलब्ध न झाल्याने अखेर एका दवाखान्याच्या दारातच या महिलेची प्रसूती झाली. तिनं २-३ नाही तर १० तासांच्या वेदना सहन करून अखेर बाळाला जन्म दिला आहे.
कोल्हापूरच्या आजरा येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आजरा शहराजवळ सालगाव येथील एका महिलेचे गडहिंग्लज तालुक्यात सासर आहे. याच ठिकाणी तिची प्रसूतिपूर्व तपासणी सुरू होती. काल सकाळच्या सुमारास तिच्या पोटात प्रचंड वेदना होत असल्यामुळे तिला उपचारासाठी गडहिंग्लज येथील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी कोरोनाची तपासणी करून या असं सांगत या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर तिचे हाल सुरू झाले.
लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा
कोरोनाची चाचणी करून घेतल्यानंतर रिपोर्ट घेऊन ती अनेक दवाखान्यात गेली पण तिला उपचारासाठी कोणीही दाखल करून घेतले नाही. नेसरी मधील ग्रामीण रुग्णालयातही ती गेली पण तिथे सिजरिंगसाठीची यंत्रणा नसल्याने या रुग्णालयाने तिला दाखल करून घ्यायला नकार दिला. त्यानंतर तिने अनेक दवाखान्यात जाऊन उपचारासाठी दाखल करून घेण्याची विनंती केली पण प्रत्येक ठिकाणी तिच्या रिपोर्टबाबत संशय व्यक्त करण्यात आला.
CoronaVirus : कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला मिळणार? समोर आला तज्ज्ञांचा 'मास्टर प्लॅन'
संपूर्ण दिवस गडहिंग्लजमध्ये फिरल्यानंतर कुठेही दवाखाना मिळत नाही म्हटल्यानंतर शेवटी नातेवाईकांनी तिला आजरा येथे आणले. आजरा येथील एका डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास होकार दिला. पण त्याचवेळी आणखी एका महिलेचे सिंजरिंग त्या रुग्णालयात सुरू होते. पोटदुखीच्या वेदना असहय्य झाल्यानं दवाखान्याबाहेरच तिची प्रसृती झाली. प्रसूतीनंतरही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा वाद पुन्हा सुरूच राहिला. त्यात रिपोर्टचा कागद फाटला त्यामुळे आणखी गैरसोय झाली. इतर रुग्णांच्या काळजीचं कारण देत या महिलेला दवाखान्यात नेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. अखेर रात्री १० नंतर या महिलेला तिच्या बाळासह गडहिंग्लजच्या कोविड सेंटरमध्ये पोहोचवण्यात आलं.
घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन