खिशात नव्हते पैसे, उधारीवर आणलेला लॅपटॉप विकला; सुरू केलं स्टार्टअप, आता लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:59 PM2023-03-15T12:59:59+5:302023-03-15T13:06:00+5:30
स्वतःवर विश्वास होता म्हणून आज लाखोंचा व्यवसाय करतोय आणि इतरांना रोजगारही देतो.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मायानगरी म्हणतात. इथे कोणाचे नशीब कधी आणि कसं बदलेल हे कोणालाच माहीत नाही. फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. प्रेम कुमारच्या बाबतीतही असंच झालं. प्रेमच्या खिशात एक पैसाही नव्हता, पण त्याला स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा होता. स्वतःवर विश्वास होता म्हणून आज लाखोंचा व्यवसाय करतोय आणि इतरांना रोजगारही देतो.
पाटण्यातील प्रेम कुमारने दिलेल्या माहितीनुसार, तो मुंबई शहर पाहण्याच्या हेतूने आला मग मुंबईत आपलंही असं अस्तित्व असेल, असं त्याला वाटलंही नव्हतं. 2018 ची गोष्ट आहे. खिशात एक रुपयाही नव्हता म्हणून तो नोकरी शोधू लागला. दिवस उलटून गेले, पण प्रेमला नोकरी मिळाली नाही. काही ठिकाणी नोकरीसाठी पैशांचीही मागणी करण्यात आली. काही काळानंतर त्याला वाटले की आपण स्वतःचा एक स्टार्टअप सुरू करावा, परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते.
प्रेम सांगतो की त्याने पाटण्याहून नुकताच लॅपटॉप आणला होता. तोही उधारीवर आणला होता. एक दिवस त्याने तो लॅपटॉप OLX आणि Facebook वर विक्रीसाठी ठेवला. अल्पावधीतच त्याच्या कष्टाला फळ मिळू लागले. सोशल मीडियावरून लॅपटॉपसाठी भरपूर चौकशी होत असल्याचे त्याने पाहिले. प्रेमची सुरुवात इथूनच झाली. लॅपटॉप विकून मिळालेल्या पैशातून त्याने लॅपटॉप आणले आणि त्याची ऑनलाईन विक्री सुरू केली.
हळूहळू प्रेमाचा धंदा सुरू झाला. आज मुंबईत आमचे स्वतःचे घर आहे आणि तिथे राहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. प्रेम आता त्याच्या कुटुंबासह मायानगरीत आनंदाने राहतो. प्रेमच्या म्हणण्यानुसार, त्याने पाच वर्षांत हे स्थान मिळवले आहे. तसेच सर्व खर्च वजा केल्यावर त्याला वर्षाला 10 लाख रुपये मिळतात. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"