बंड करून नवा पक्ष; जेलमधून आले अन् मुख्यमंत्री झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:43 AM2024-06-03T11:43:01+5:302024-06-03T11:43:24+5:30
शिक्षक ते राजकारणी असा प्रेमसिंग यांचा प्रवास
गंगटोक : सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत आला आहे. या पक्षाला विधानसभेच्या ३२ जागांपैकी ३१ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष पीएस गोळे ऊर्फ प्रेमसिंग तमांग यांनी २०१९ मध्ये १७ जागा जिंकत राज्यात २४ वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या चामलिंग सरकारला हटविले होते. यावेळी त्यांनी ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या आहेत.
चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील एसडीएफचे संस्थापक सदस्य प्रेमसिंग तमांग यांनी २०१३ मध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंड करून सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची स्थापना केली. त्यांनी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
कोण आहेत तमांग?
तमांग यांनी सरकारी शाळेत शिक्षक म्हणून तीन वर्षे काम केले. १९९४ पासून ते सलग पाचवेळा सिक्कीम विधानसभेवर निवडून गेले. सरकारच्या चौथ्या कार्यकाळात (२००९-१४) चामलिंग यांनी त्यांना मंत्रिपद देण्यास नकार दिला. यानंतर तमांग यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला.
निधीची अपहार केल्याबद्दल २०१६ मध्ये गेले तुरुंगात
२०१६ मध्ये, तमांग यांना १९९४ ते १९९९ दरम्यान सरकारी निधीची अपहार केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले. nप्रेमसिंग तमांग हे राज्यातील पहिले राजकारणी होते ज्यांना दोषी ठरवून विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. २०१८ मध्ये जेव्हा तमांग तुरुंगातून बाहेर आले.