Corona Vaccine: तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार कोरोनावरील लस?; जाणून घ्या सरकारचा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 04:46 AM2020-12-16T04:46:24+5:302020-12-16T06:54:54+5:30

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अधिकारी, कोल्ड चेन हाताळणारे, सुपरवायझर, डाटा मॅनेजर, आशा वर्कर यांना प्रशिक्षित केले जात आहे.

Preparation in 36 States Union Territories with Two Level Transport System to distribute Corona Vaccine | Corona Vaccine: तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार कोरोनावरील लस?; जाणून घ्या सरकारचा प्लान

Corona Vaccine: तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार कोरोनावरील लस?; जाणून घ्या सरकारचा प्लान

googlenewsNext

-  एस. के. गुप्ता

नवी दिल्ली : देशात ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत दोनस्तरीय वाहतूक व्यवस्थेसह कोरोना लस देण्याचे काम केले जाईल. राज्य स्तरावर आरोग्य सचिव आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांशिवाय सगळ्या जिल्ह्यांत टास्क फोर्स बनवून लसीकरण केले जाईल व लसीकरण कार्यक्रमात २३ मंत्रालये मिळून काम करतील.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अधिकारी, कोल्ड चेन हाताळणारे, सुपरवायझर, डाटा मॅनेजर, आशा वर्कर यांना प्रशिक्षित केले जात आहे. याशिवाय २९ हजार कोल्ड चेन पॉइंट्स व ४१ हजार डीप फ्रीजर बनवले जात आहेत. केंद्र सरकारने लसीकरण व त्याच्या तयारीसाठी दिलेल्या निर्देशांनुसार प्रत्येक पॉइंटवर एकावेळी १००-२०० जणांना लस दिली जाईल. लस दिल्यावर अर्धा तास त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. काही तक्रार असल्यास लगेच वैद्यकीय सेवा मिळेल. लसीकरण केंद्रात एका वेळी एकाच व्यक्तीला आत जाऊ दिले जाईल.

लसीकरणासाठी लोकांकडून आधी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करून घेतली जाईल. कोणाला आधी लस दिली जावी याचे प्राधान्य ठरवले जाईल. तात्काळ नोंदणी किंवा कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी लसीकरणासाठी चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, इंग्लंडमध्ये कोरोना लसीकरण करताना अनेक लोकांना आराेग्याच्या तक्रारी येत आहेत. भारतातही त्यांची शक्यता आहे. भारतात लसीकरणाच्या साइड इफेक्टशी लढणे प्रत्यक्षात आव्हानात्मक असेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर कोरोना लसीबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न होतील त्यापासून सावध राहावे.

कोरोनाचा फैलाव रोखण्याबद्दल समाधान व्यक्त करून भूषण म्हणाले, भारतात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट झाला आहे. दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये आजही जास्त रुग्ण निघत आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना फैलावाबद्दल स्थिती सध्या काळजीची आहे. दिल्लीत परिस्थिती सुधारली आहे. भारतात १५ कोटी ५५ लाख चाचण्या झाल्या आहेत. ॲक्टिव्ह केस तीन लाख ४० हजारच्या जवळपास आहेत, तर ९४ लाख लोक पूर्ण बरे झाले आहेत.
 

Web Title: Preparation in 36 States Union Territories with Two Level Transport System to distribute Corona Vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.