राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:22 AM2024-10-25T10:22:18+5:302024-10-25T10:22:43+5:30

विविध राज्यांत विधानसभा व लाेकसभेच्या काही जागा रिक्त

Preparations for Rajya Sabha and other by-elections, moves by the Central Election Commission | राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचाली

हरीश गुप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा आणि इतर राज्यांत ५० विधानसभा तसेच लाेकसभेच्या काही जागांसाठी पाेटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयाेग जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा व इतर राज्यांतील पाेटनिवडणुकीसाठी देखील तयारी करीत आहेत.

सध्या २३१ सदस्य संख्या असलेल्या वरिष्ठ सभागृहात भाजपचे ९५ सदस्य आहेत. या सभागृहात १२ जागा रिक्त असून, यात जम्मू-काश्मीरमधून ४, आंध्र प्रदेशातून ४, नामनिर्देशित सदस्यांच्या ४ तर ओडिशा आणि हरयाणातून प्रत्येकी एक जागांचा समावेश आहे. वायएसआर काँग्रेसचे दोन आणि बिजदच्या एका सदस्याने राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. त्यापैकी बिजद सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

जम्मू-काश्मीरच्या ४ जागांचे गणित

जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकारचा शपथविधी झाल्यानंतर राज्यातील राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होईल. यात नॅकाँ व काँग्रेस युतीस तीन जागांवर विजय अपेक्षित आहे. यामुळे सभागृहातील काँग्रेस-माकप व आप तसेच इतर ५ अपक्ष, अशी या आघाडीची संख्या ५५ पर्यंत जाऊ शकते. यात भाजपला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

यांना संधी मिळण्याची शक्यता

  • नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता. 
  • भाजपकडून माजी उपमुख्यमंत्री निर्मलसिंह आणि कविंदर गुप्ता यांच्यापैकी एकास संधी मिळेल.

Web Title: Preparations for Rajya Sabha and other by-elections, moves by the Central Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.