पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 06:03 PM2023-08-13T18:03:29+5:302023-08-13T18:13:15+5:30

गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता.

preparations take out brijmandal yatra again nuh decision palwal mahapanchayat haryana violence | पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

googlenewsNext

हरयाणातील नूह येथे पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार आहे. पलवलमध्ये झालेल्या हिंदू महापंचायतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्यात २८ ऑगस्टला पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार असल्याचे महापंचायतीत सांगण्यात आले. मात्र, या यात्रेची तारीख मागे किंवा पुढे होऊ शकते. दरम्यान, गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

सर्व हिंदू संघटनांनी २८ ऑगस्ट रोजी यात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी अपेक्षा आहे, असे विश्व हिंदू परिषद विभागाचे मंत्री देवेंद्र सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, आज पलवलमध्ये हिंदू महापंचायत झाली. या हिंदू महापंचायतीला विश्व हिंदू परिषदेच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती. पलवलचे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, अनेक अटींवर परवानगी देण्यात आली आहे. द्वेषयुक्त भाषण प्रतिबंधित आहे. आमची टीम प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवेल आणि लोकांवर कोणतीही चुकीची कारवाई केली जाईल.

हिंदू महापंचायतीत केलेल्या मागण्या
हिंसाचाराचा तपास एनआयएकडून करण्यात यावा. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना एक कोटी रुपये आणि सरकारी नोकरी द्यावी. जखमींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देण्यात यावी. दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना भरपाई मिळावी. बेकायदेशीर घुसखोरांना राज्यातून हाकलून द्यावे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर पाठवले पाहिजे. नुह जिल्ह्यातील किंवा आसपासच्या गावातील लोकांना शस्त्र परवाना देण्यात यावा. परिसरात निमलष्करी दल तैनात करावे, मेवातमध्ये मुख्यालय करावे, दंगली घडवणाऱ्यांची ओळख पटवावी आणि त्यांचे घर जप्त करावे, अशा मागण्या हिंदू महापंचायतीत करण्यात आल्या.

ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती- आचार्य आझाद शास्त्री
महापंचायतीत हरयाणा गौ रक्षक दलाचे आचार्य आझाद शास्त्री यांनी ही 'करा किंवा मरा' अशी स्थिती असल्याचे म्हटले आणि तरुणांना शस्त्रे उचलण्यास सांगितले. शास्त्री म्हणाले की, आपण मेवातमध्ये १०० शस्त्रांचा परवाना ताबडतोब घेतला पाहिजे. बंदुकांचा नव्हे तर रायफल्सचा. कारण रायफल लांब अंतरापर्यंत गोळीबार करू शकतात. ही 'करा किंवा मरा' अशी परिस्थिती आहे. हिंदू आणि मुस्लिमांच्या आधारावर या देशाची फाळणी झाली. तसेच तरुणांनी एफआयआरला घाबरू नका असे सांगितले. एफआयआरला घाबरण्याची गरज नाही. माझ्यावरही एफआयआर आहेत, पण आपण घाबरू नये, असे शास्त्री यांनी सांगितले.

Web Title: preparations take out brijmandal yatra again nuh decision palwal mahapanchayat haryana violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Haryanaहरयाणा