तयारी एनडीएची!

By Admin | Published: May 14, 2017 04:36 AM2017-05-14T04:36:56+5:302017-05-14T04:36:56+5:30

एनडीए परीक्षेच्या माध्यमातून देशाची प्रामाणिकपणे सेवा करायला मिळते.

Preparing NDA! | तयारी एनडीएची!

तयारी एनडीएची!

googlenewsNext

- प्रा. राजेंद्र चिंचोले
एनडीए परीक्षेच्या माध्यमातून देशाची प्रामाणिकपणे सेवा करायला मिळते. देशाचे रक्षक म्हणून मिळणारा मान, सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक स्थान, पदोन्नतीच्या भरपूर संधी, चांगले वेतन, भत्ते, पेन्शन, उच्च शिक्षणाच्या संधी या सर्व गोष्टींचा विचार करून संरक्षण क्षेत्रात नोकरी करून राष्ट्रीय कार्य पार पाडता येऊ शकते. या परीक्षेसाठी उंची १५७.५ से.मी. व हवाईदलासाठी १६२.५ से.मी. अशी शारीरिक पात्रता निश्चित केली आहे. ही परीक्षा देणारा हा अविवाहित पुरुष असावा. पूर्ण प्रशिक्षण होईपर्यंत उमेदवारास लग्न करता येणार नाही. लेखी परीक्षा, व्यक्तिमत्त्व चाचणी व वैद्यकीय चाचणी या तीन टप्प्यांमधून निवड केली जाते. या परीक्षेस निगेटिव्ह मार्र्किं ग पद्धत लागू आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर ही दोन केंद्रे आहेत.
भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमी ठऊअ व नवाल अकादमी ठअ प्रवेश घ्यावा लागतो. एनडीए व एनएत प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग वढरउ मार्फत दरवर्षी एप्रिल व सप्टेंबर महिन्यांत दोन वेळा परीक्षा घेतली जाते. या वर्षीची एनडीए ही परीक्षा २३ एप्रिल २०१७ रोजी झाली, तर एनडीए कक ही परीक्षा १० सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. २३ एप्रिल २०१७ रोजी झालेली परीक्षा २ जानेवारी २०१८ रोजी सुरू होणाऱ्या एनडीएच्या १३९व्या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी व नवाल अकादमीच्या १०१व्या प्रशिक्षण वर्गात उमेदवार निवडीसाठी होणार आहे. परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज पद्धतीने  संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. एनडीएत प्रवेश मिळाल्यानंतर पदवीबरोबर सैन्यात अधिकारी होण्याची संधी मिळते. ३ वर्षे एनडीए व एक वर्ष इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. नवाल अकादमीत 
४ वर्षांत बी.टेक. ही पदवी देण्यात येते व नौदलाच्या कार्यकारी व तांत्रिक विभागात संधी देण्यात येते. 
सेनादलात प्रवेशासाठी १२वी उत्तीर्ण तर नौदल, हवाईदल व नवाल अकादमीसाठी भौतिकशास्त्र व गणित विषय घेऊन इ. १२वी परीक्षा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. १२वी परीक्षेला बसलेले विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतात; पण मुलाखतीवेळी त्यांना १२वी उत्तीर्ण परीक्षेच्या प्रमाणपत्राचा पुरावा आयोगाला सादर करावा लागतो.
लेखी परीक्षा ही ९०० गुणांची असून, गणित व सामान्य क्षमता चाचणी असे दोन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे पेपर इंग्रजी व हिंदी भाषांत असतात. दोन्ही पेपरचा कालावधी २.५ तासांचा असून, गणित ३०० गुणांना १२० प्रश्न, तर सामान्य क्षमता चाचणी ६०० गुणांना १५० प्रश्न आहेत. गणिताच्या प्रत्येक बरोबर उत्तरास २.५ गुण मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरास ०.८३ गुण वजा केले जातात. सामान्य क्षमता चाचणीच्या प्रत्येक बरोबर उत्तरास ४ गुण मिळतात. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरास १.३३ गुण वजा केले जातात. सामान्य क्षमता चाचणी या पेपरमध्ये इंग्रजी २०० गुणांसाठी, भौतिकशास्त्र १०० गुणांसाठी, रसायनशास्त्र ६० गुणांसाठी, सामान्य विज्ञान ४० गुणांसाठी, इतिहास ८० गुणांसाठी, भूगोल ८० गुणांसाठी व चालू घडामोडी ४० गुणांसाठी असतात. गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न ११वी व १२वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. शास्त्र विषयाचा अभ्यास करताना मूलभूत समजून घेणे लाभदायक ठरते. इतिहास, भूगोलाचा अभ्यास करताना ठउएफळ ची पाठ्यपुस्तके अभ्यासणे गरजेचे आहे. चालू घडामोडींमध्ये क्रीडा, पुरस्कार, पुस्तके, राजकीय घडामोडी, पर्यावरण यावर आधारित प्रश्न विचारले जातात. 
लेखी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सिलेक्शन बोर्डाद्वारे ९०० गुणांची मुलाखत घेतली जाते. ही परीक्षा ५ दिवस व दोन टप्प्यांत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात डकफ व ढढ&ऊळ चाचणीनंतर उमेदवारांची संख्या कमी केली जाते. यात स्क्रिनिंग टेस्ट होते. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्यावर आधारित गटचर्चेचा समावेश असतो. दुसऱ्या टप्प्यात डकफ व ढढ&ऊळ चाचणी उत्तीर्ण विद्यार्थ्याची मुलाखत घेतली जाते. यात मानसशास्त्रीय चाचणी, नेतृत्वगुण, वक्तृत्व गुण, जिज्ञासू वृत्ती, बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, गटचर्चा, सांघिक नियोजन शारीरिक क्षमता पाहणाऱ्या चाचण्या घेतल्या जातात. जे उमेदवार इंग्रजीत आपले विचार स्पष्ट व आत्मविश्वासाने मांडू शकतात त्यांना याचा फायदा होतो. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, नियमित व्यायाम, नेतृत्वगुण व खेळाडू वृत्ती विकसित करणे गरजेचे आहे. यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी लष्करी इस्पितळात बोलविले जाते. एनडीएत निवड निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण तीन वर्षांचे असते. त्यानंतर उमेदवारांना पदवी बहाल केली जाते. नवाल अकादमीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांचे प्रशिक्षण देऊन बी.टेक. पदवी दिली जाते. एनडीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १ वर्ष प्रशिक्षण दिले जाते. सैन्यदलात निवड झालेल्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लेफ्टनंट पदावर नियमित सेवेत घेतले जाते. त्यानंतर नौदलातील उमेदवारांना उपकार्यकारी लेफ्टनंट, तर हवाईदलातील उमेदवारांना फ्लाइंग आॅफिसर म्हणून नियमित सेवेत घेतले जाते.
संरक्षणदलात अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नाविक अकादमीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश मिळावा या उद्देशाने राज्य सरकारच्या सैनिक सेवा पूर्व शिक्षण संस्था (रढक) मार्फत ठऊअ व ठअ च्या लेखी परीक्षा व मुलाखतीची तयारी करून घेण्यात येते. रढक मधून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांची संरक्षण दलात अधिकारी म्हणून निवड झाली आहे. रढक मार्फत मोफत निवास, जेवण व्यवस्था उपलब्ध असून, इ. ११वी, १२वी विज्ञानचीही तयारी करून घेतली जाते. वक्तृत्व, संभाषण कौशल्य, समूहचर्चा, सामान्य ज्ञान या घटकांची तयारी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांकडून केली जाते. रढक मध्ये प्रवेशासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची सेवा परीक्षा घेतली जाते. दहावीचे गुण व प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारे मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवले जाते. त्यानंतर प्रवेश दिला जातो व तयारी करून घेतली जाते.

Web Title: Preparing NDA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.