नितीशकुमार यांच्यासह अन्य पक्षांच्या दोन डझन नेत्यांना फोडण्याची तयारी, इंडिया आघाडीला भाजप धक्का देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 05:44 AM2024-01-20T05:44:38+5:302024-01-20T05:45:11+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला जोरदार धक्का देण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. यानुसार, इंडिया आघाडीतील दोन डझनहून अधिक नेत्यांना भाजपसोबत आणण्याचा प्रयत्न आहे, तर काही नेत्यांना भाजपकडून तिकिट देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीची ठरली रणनीती
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नितीशकुमार यांच्या संपर्कात भाजप नेते आहेत. नितीशकुमार यांना बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदावर कायम राहायचे आहे. त्या बदल्यात ते भाजपला मदत करू शकतात. हरयाणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले अशोक तंवर हेही भाजपच्या संपर्कात आहेत.