चीनला प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी! लेहमध्ये एलएसीसह 135 किमी लांबीचा महामार्ग बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:19 PM2023-01-24T12:19:35+5:302023-01-24T12:20:58+5:30
गेल्या काहीव दिवसापासून चीन आणि भारताच्या सीमेवर चीन अतिक्रमण करत असल्याचे समोर आले आहे. यावरुन दोन्ही देशातील सैन्यांमध्ये धुसफूस सुरू आहे.
गेल्या काहीव दिवसापासून चीन आणि भारताच्या सीमेवर चीन अतिक्रमण करत असल्याचे समोर आले आहे. यावरुन दोन्ही देशातील सैन्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. चीनसोबतच्या उघड संघर्षामुळे, चुशूल ते डेमचोकपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 135 किमी लांबीचा सिंगल लेन महामार्ग येत्या दोन वर्षांत तयार होईल, हा महामार्ग देशासाठी महत्त्वाचा धोरणात्मक रस्ता असणार आहे.
प्रक्रिया सुरू करून, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 23 जानेवारी रोजी चुशूल-डुंगटी-फुक्चे-डेमचोक महामार्ग पूर्ण केला, याला CDFD रस्ता म्हणूनही ओळखले जाते. बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. 400 कोटी खर्चून तयार होणारा हा रस्ता येत्या दोन वर्षांत तयार होणार असून, त्यात सध्याचा रस्ता सिंगल लेनच्या आधारे तयार करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. नवीन रस्ता सिंधू नदीच्या बाजूने धावेल जो LAC ला अक्षरशः समांतर असमार आहे.
अनोखा मॉल! कडक्याच्या थंडीत गरीबांसाठी मायेची ऊब; 'या' ठिकाणी मोफत मिळतात स्वेटर, ब्लँकेट
भारत-चीन सीमेवरील हा महत्त्वाचा मार्ग आहे. नवीन रस्त्यामुळे सैनिकांची तुकडी आणि उपकरणे लवकरात लवकर पोहोचू शकतील, यासोबतच या परिसराच्या बाजूने संरक्षण राहणार आहे.
7.45 मीटर रुंद रस्त्यावर तीन महत्त्वाचे पूलही बांधण्यात येणार आहेत. बीआरओने 2018 मध्ये या रस्त्याचा विस्तार प्रकल्प अहवाल तयार केला होता. आता यासाठी 23 जानेवारीला दोन पॅकेजमध्ये निविदा मागवण्यात आल्या आहेत.
लेह प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे आणखी एक मोठे पाऊल असेल, यापूर्वी BRO ने लडाखमधील न्युमा एअरफील्डच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या होत्या, जे लढाऊ विमानांसाठी एक आधुनिक लँडिंग साइट असणार आहे.