विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 05:46 PM2024-10-24T17:46:39+5:302024-10-24T17:48:18+5:30

गुरुवारी एअर इंडियाच्या २०, इंडिगोच्या २०, विस्ताराच्या २० आणि आकासाच्या २५ विमानांना एकाच वेळी धमकी आली , यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला.

Preparing to take action against aircraft threats, the government sought data from META and 'X' | विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला

विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला

गेल्या काही दिवसापासून देशात विमानांना धमकीचे मेसेज येत आहेत, यामुळे अनेक उड्डानावर याचा परिणाम झाला आहे. आज गुरुवारी एकाच वेळी ८५ विमानांना धमकीचा इशारा देण्यात आला, त्यानंतर पोलीस प्रशासनात गोंधळ उडाला आहे. दरम्यान, आता सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दिल्ली पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत ९० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमकावल्याप्रकरणी ८ स्वतंत्र एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेली माहिती अशी, सरकार धमक्या देणारे बनावट संदेश आणि कॉल गांभीर्याने घेत आहे. सरकार अनेक धमकीचे संदेश शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानुसार कारवाई करत आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म META आणि एक्स यांना डेटा शेअर करण्यास आणि तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. 

Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू'

गुरुवारी एअर इंडियाची २०, इंडिगोची २०, विस्ताराची २० आणि आकाशाची २५ विमाने एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. आजच्या घटनेपूर्वी, १७० हून अधिक फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यापैकी बहुतेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आले होते. हे नंतर खोटे असल्याचे सिद्ध झाले, पण  यामुळे शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली आणि निमलष्करी दल आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली.

याआधी दिल्ली पोलिसांनी ९० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या संदर्भात गेल्या आठ दिवसांत आठ स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. ज्या फ्लाइट्सना धमक्या आल्या आहेत त्यात आकासा, एअर इंडिया, इंडिगो आणि विस्तारा या विमान सेवांचा समावेश आहे. ही उड्डाणे दिल्लीहून विविध देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी चालतात. या प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बॉम्बच्या धमक्यांमुळे, बनावट कॉल करणाऱ्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची योजना सरकारने आखली आहे. विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या देणारे बनावट कॉल करणे हा दखलपात्र गुन्हा मानला जाईल, असे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटले आहे. 

Web Title: Preparing to take action against aircraft threats, the government sought data from META and 'X'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान