युद्धाची तयारी! चीनने तिबेटकडे पाठवली हजारो टनांची लष्करी सामुग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:19 PM2017-07-19T16:19:22+5:302017-07-19T16:19:22+5:30

भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीनने तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे.

Preparing for war! China sends thousands of tons of military equipment to Tibet | युद्धाची तयारी! चीनने तिबेटकडे पाठवली हजारो टनांची लष्करी सामुग्री

युद्धाची तयारी! चीनने तिबेटकडे पाठवली हजारो टनांची लष्करी सामुग्री

Next

 ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 19- सिक्कीम जवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीनने तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे. त्यामुळे  या संघर्षात आणखी भर पडणार आहे.  चिनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवली आहे. पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते. 
 
मागच्या महिन्यापासून रस्ते आणि रेल्वे मार्गाने ही सैन्य सामुग्री पाठवण्याचे काम चालू आहे. चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नाथू -ला पर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे. चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून 700 किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात लागू शकतात. 
 
आणखी वाचा 
 
सध्या तिबेटमध्ये चीनी लष्कराचा युद्ध सराव सुरु आहे. पिपल्स लिबरेशन आर्मी फायरिंगचा सराव करत आहे. सिक्कीमच्या डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय सैन्य एक इंचही मागे हटायला तयार नसल्याचे चीनकडून युद्धाची भाषा केली जात आहे. 

तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
 
ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सरावात पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री कमांड आणि चीनच्या पठार डोंगराळ भागात तैनात असणा-या ब्रिगेडने भाग घेतला. पिपल्स लिबरेशन आर्मी तिबेटमधील भारत - चीन सीमारेषेवर तैनात असते. तिबेटला जोडण-या डोंगराळ भागांमध्ये हे सैन्य तैनात असतं. सीसीटीव्ही वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हे सैन्य गेल्या खूप दिवसांपासून ब्रम्हपुत्र नदीच्या मध्य आणि खालील भागात तैनात आहे. 
 
चीनी सैनिकांनी केलेल्या सराव अभ्यासात हल्ल्यादरम्यान कशाप्रकारे इतर तुकड्या एकत्रित येऊन उत्तर देतील याचा अभ्यास करण्यात आला. यासंबंधीचा एक व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये ग्रेनेड आणि मिसाईलचा वापर करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं.
 
या व्हिडीओमध्ये कशाप्रकारे रडार युनिटच्या सहाय्याने शत्रुच्या विमानाचा पत्ता लावला जाऊ शकतो, आणि सैनिक ते नेस्तनाभूत करु शकतात हेदेखील दाखवण्यात आलं. जवळपास 11 तासाहून जास्त वेळ हा सराव अभ्यास चालू होता. 
 
 ..नाहीतर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू, चीनचा भारताला इशारा
 जो तर्क लावत भारतीय सैन्यांनी चीन आणि भूतानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवला आहे, त्याच तर्काच्या आधारे आम्ही काश्मीरमध्ये घुसू असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. 
 
"जरी भूतानने आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी भारताची मदत मागितली असली, तरी ती मर्यादित असली पाहिजे. वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवायची गरज नाही", असं चीनच्या वेस्ट नॉर्मल यूनिव्हर्सिटीमधील भारताच्या अध्ययन विभागाचे प्राध्यापक आणि व्यवस्थापक लॉन्ग शिंगचून बोलले होते. "नाहीतर याच तर्काच्या आधारे जर पाकिस्तान सरकारने आम्हाला विनंती केली तर दिस-या देशाचं सैन्य भारत आणि पाकिस्तानमधील वादग्रस्त जमिनीवर पाय ठेवेल. यामध्ये भारत नियंत्रित काश्मीरचाही समावेश असेल" असा धमकीवजा इशारा देण्यात आला होता. 

Web Title: Preparing for war! China sends thousands of tons of military equipment to Tibet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.