पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारताच्या सरन्यायाधीशांच्या डोळयात तरळले अश्रू
By admin | Published: April 24, 2016 01:15 PM2016-04-24T13:15:48+5:302016-04-24T14:18:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या कार्यक्रमात बोलताना भारताचे मुख्य सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांना रविवारी अचानक बांध फुटला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असलेल्या कार्यक्रमात बोलताना भारताचे मुख्य सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांना रविवारी अचानक बांध फुटला. त्यांच्या डोळयात अश्रू तरळले. न्यायव्यवस्थेवरील वाढता ताण कमी करावा यासाठी सरकारला आवाहन करत असताना भारताचे मुख्य सरन्यायाधीश प्रचंड भावूक झाले.
रविवारी दिल्लीतील विज्ञान भवनात राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्ती यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या देशाच्या विकासासाठी मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही संपूर्ण ताण न्यायव्यवस्थेवर टाकू नका. संपूर्ण जगाच्या तुलनेत तुम्ही आमची कामगिरी बघा.
एफडीआय, मेक इन इंडिया इतकीच न्यायाधीशांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात न्यायव्यवस्था कशी चालते याबद्दल परदेशातील न्यायाधीशांना आश्चर्य वाटते. भारतात एक न्यायाधीश सरासरी २६०० प्रकरणे हाताळतो अमेरिकेत हेच प्रमाण ८१ आहे असे ठाकूर यांनी सांगितले.
Chief Justice of India TS Thakur breaks down during his speech at Jt conference of CMs and CJ of HCs in Delhi pic.twitter.com/97SJDnyXXz
— ANI (@ANI_news) April 24, 2016