"हवा की ओट लेकर भी चिराग जलता है"... हिंदीत शेर ऐकवत अर्थसंकल्पाचे सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 11:36 AM2019-07-05T11:36:12+5:302019-07-05T11:50:30+5:30
सितारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली
नवी दिल्ली - देशाचे बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना सुरुवतालीच हिंदीत शेर ऐकवला. भारतीय अर्थव्यवस्थेतेतील सकारात्मक बदल आणि देशाचा आर्थिक विकास याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सितारमण यांनी सभागृहात भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, ''यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है'', असे म्हणत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली.
देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारमण या पहिल्या अर्थमंत्री आहेत. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1970 साली इंदिरा गांधी यांनीच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी, पंतप्रधानपदी असतानाही, त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे स्वतंत्र भारतानंतर स्वतंत्रपणे बजेट सादर करणाचा मान पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारमण यांना मिळाला आहे. निर्मला सितारमण यांनी लंडनमध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस आणि सहायक अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.
Budget 2019 Live Updates: मोदी 2.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प, मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल का?
सितारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली. सन 2014 मध्ये 1.85 खरब डॉलर असलेली अर्थव्यवस्था 2.7 खरब अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर पुढील काही वर्षात हीच अर्थव्यवसथा 5 खरब डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे उद्धिष्ट असल्याचे सितारमण यांनी सांगितले.
हमारी अर्थव्यवस्था 2014 में 1.85 खरब डॉलर से 2.7 खरब अमेरिकी डॉलर तक पहुंची, हम अगले कुछ वर्षों में बहुत अच्छी तरह से 5 खरब डॉलर तक पहुँच सकते हैं: वित्त मंत्री @nsitharaman#Budget2019#UnionBudget2019#BudgetForNewIndia
— दूरदर्शन न्यूज़ (@DDNewsHindi) July 5, 2019