मेजर मनजीत आणि नायक दिलावर खान यांना कीर्ती चक्र; ९३ जवानांना शौर्य पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 21:18 IST2025-01-25T21:16:30+5:302025-01-25T21:18:33+5:30
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी ९३ सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना शौर्य पुरस्कार मंजूर केले.

मेजर मनजीत आणि नायक दिलावर खान यांना कीर्ती चक्र; ९३ जवानांना शौर्य पुरस्कार
Gallantry Awards: ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील ९३ कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी ११ जणांना मरणोत्तर हा सन्मान देण्यात आला आहे. मेजर मनजीत आणि नायक दिलवर खान यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. नायक दिलवर खान यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर १४ वीर जवानांना शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे.
लष्कराच्या २२ राष्ट्रीय रायफल्सचे मेजर मनजीत आणि २८ राष्ट्रीय रायफल्सचे नाईक दिलावर खान यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात येणार आहे. शौर्य चक्र प्राप्त करणाऱ्यांमध्ये १ आरआरचे मेजर कुणाल, ५० आरआरचे अभियंता मेजर आशिष दहिया, ४ आरआरचे मेजर सत्येंद्र धनखर, ४८ आरआरचे कॅप्टन दीपक सिंग (मरणोत्तर), ४ आसाम रायफल्सचे असिस्टंट कमांडंट ई किकॉन, सुभेदार विकास तोमर यांचा समावेश आहे.
१ पॅरा (एसएफ), २० जाट सुभेदार मोहन राम, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल हवालदार रोहित कुमार डोग्रा (मरणोत्तर), ३२ आरआरचे हवालदार प्रकाश तमांग, हवाई दलाचे पायलट फ्लाइट लेफ्टनंट अमन सिंग हंस, कॉर्पोरल डी संजय, बीआरडीबीचे विजयन कुट्टी (मरणोत्तर), केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डेप्युटी कमांडंट विक्रांत कुमार आणि निरीक्षक जे हमिंगचुलो यांनाही शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण ९३ सैनिकांना शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. २ कीर्ती चक्र आणि १४ शौर्य चक्रांव्यतिरिक्त, यात शौर्यसाठी १ सेना पदक, ६६ सेना पदके (सात मरणोत्तर), २ नौसेना पदके (शौर्य) आणि ८ वायु सेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे. १ पॅरा (स्पेशल फोर्स) बटालियनचे सुभेदार विकास तोमर यांना जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील मछेडी सेक्टरमध्ये केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार केल्याबद्दल शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपतींकडून शौर्य पुरस्कारांची घोषणा
२ कीर्ती चक्र, त्यापैकी एक मरणोत्तर आहे.
१४ शौर्य चक्र, त्यापैकी तीन मरणोत्तर.
१ सेना पदक (शौर्य).
६६ सेना पदके, त्यापैकी सात मरणोत्तर .
२ नौदल पदक (शौर्य).
८ वायु सेना पदक (शौर्य).
President Droupadi Murmu has approved Gallantry awards to 93 Armed Forces and Central Armed Police Forces personnel, including 11 posthumous, on the eve of 76th Republic Day. These include two Kirti Chakras, including one posthumous; 14 Shaurya Chakras, including three… pic.twitter.com/pbzYJLOsHA
— ANI (@ANI) January 25, 2025
मेजर मनजीत
पंजाब रेजिमेंटच्या मेजर मनजीत यांना एप्रिल २०२४ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन दरम्यान एका दहशतवाद्याला ठार मारल्याबद्दल आणि अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवल्याबद्दल कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
दिलावर खान
भारतीय लष्कराच्या आर्टिलरी रेजिमेंटचे दिलावर खान यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांनी अतुलनीय धैर्य दाखवून जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील लोगान भागात एका कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. नाईक दिलावार खान २३ जुलै २०२४ रोजी कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब व्हॅलीच्या घनदाट जंगलात एका हल्ल्यात सामील होता. त्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पथकाला दोन दहशतवादी दिसले, त्यापैकी एक दहशतवादी अगदी जवळ होता. त्यांच्या ॲम्बुश पथकाने दहशतवाद्यांवर गोळीबार केला. दहशतवाद्याकडून गंभीर धोका जाणवू लागल्याने नायक दिलावर खान यांनी जोरदार गोळीबार करूनही दहशतवाद्याला पकडले. त्याला गुंतवून ठेवले तर दुसरा दहशतवादी दुरूनच अंदाधुंद गोळीबार करत होता. या धाडसादरम्यान नायक दिलावर खान गंभीर जखमी झाले. जखमी असूनही त्यांनी दहशतवादाल्या सोडले नाही आणि गोळीबार करून दहशतवाद्याला कंठस्नान घातले.