सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण; राष्ट्रपती म्हणाल्या, छान वाटले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 05:31 AM2023-04-09T05:31:32+5:302023-04-09T05:32:25+5:30

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथील हवाई दलाच्या तळावरून सुखोई-३० लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेतली.

President Dropaudi Murmu To Fly In Sukhoi Fighter Aircraft From Tezpur Air Force Station | सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण; राष्ट्रपती म्हणाल्या, छान वाटले...

सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण; राष्ट्रपती म्हणाल्या, छान वाटले...

googlenewsNext

तेजपूर (आसाम) :

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथील हवाई दलाच्या तळावरून सुखोई-३० लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेतली. लढाऊ विमानातून त्यांनी पहिल्यांदा उड्डाण केले. ग्रुप कॅप्टन नवीन कुमार तिवारी यांनी विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘छान वाटले.’ राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. 

२५ मिनिटे सफर करून परतल्यानंतर राष्ट्रपतींनी 
ग्रुप कॅप्टनसोबत आणखी छायाचित्रे दिली, तसेच उपस्थितांना  हात उंचावून अभिवादन केले. 

Web Title: President Dropaudi Murmu To Fly In Sukhoi Fighter Aircraft From Tezpur Air Force Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.