President Droupadi Murmu यांनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार; PM मोदीं शेजारी असलेली 'ही' प्रतिष्ठित महिला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:04 PM2022-07-25T16:04:16+5:302022-07-25T16:15:38+5:30

द्रौपदी मुर्मू यांनी आज घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

President Droupadi Murmu oath taking ceremony know who is old lady sitting next to pm narendra modi | President Droupadi Murmu यांनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार; PM मोदीं शेजारी असलेली 'ही' प्रतिष्ठित महिला कोण?

President Droupadi Murmu यांनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार; PM मोदीं शेजारी असलेली 'ही' प्रतिष्ठित महिला कोण?

googlenewsNext

Droupadi Murmu President bows down: भारत देशाच्या इतिहासात २१ जुलैला एक अतिशय मोठी घटना घडली. आदिवासी घटकातील महिला द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणून विराजमान होण्याचा मान मिळवला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार असलेले यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. त्यानंतर आज देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पांरपरिक पद्धतीने त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मुर्मू यांनी एका उपस्थित महिलेला अतिशय विनम्रतेने नमस्कार केल्याचा फोटो चर्चेत आला. त्याबाबत जाणून घेऊया...

द्रौपदी मुर्मू यांनी शपथग्रहण सोहळ्याआधी अनेकांना अभिवादन केले. प्रसारमाध्यमांनी क्लिक केलेल्या फोटोंमध्ये एका वृद्ध महिलेला द्रौपदी मुर्मू या अतिशय विनम्रपणे नमस्कार करताना दिसल्या. ती महिला नक्की कोण? असा सवाल अनेकांना पडला होता. ही महिला संपूर्ण देशाच्या परिचयाचे नाव असूनही मास्क लावले असल्या कारणाने अनेकांनी त्या महिलेला ओळखलं नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी बसलेली ती महिला म्हणजे इतर कोणीही नसून माजी राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील (pratibha devi singh patil) या आहेत.

द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील यांना अतिशय आदरपूर्वक वाकून नमस्कार करतानाचा क्षण (सौजन्य-पीटीआय)

प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या रांगेत स्थान

प्रतिभाताई पाटील या २००७ ते २०१२ या दरम्यान देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान होत्या. त्याआधी २००७ पर्यंत त्या तीन वर्षे राजस्थानच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. प्रतिभा पाटील या महाराष्ट्र विधानसभेच्या तसेच देशाच्या लोकसभा व राज्यसभेच्या सदस्य देखील होत्या. एपीजे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर त्या जागी प्रतिभाताई पाटील यांनी पदभार स्वीकारला. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, भारताच्या सर्व माजी राष्ट्रपतींपैकी रामनाथ कोविंद वगळता केवळ प्रतिभा पाटील याच हयात माजी राष्ट्रपती आहेत.

Web Title: President Droupadi Murmu oath taking ceremony know who is old lady sitting next to pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.