President Election 2022: शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीचे उमेदवार; विरोधी पक्षाची सहमती? भाजपाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 09:27 PM2022-06-13T21:27:54+5:302022-07-04T19:06:17+5:30

१८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल.

President Election 2022: Sharad Pawar May be Presidential Candidate from Opposition, Challenge the BJP | President Election 2022: शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीचे उमेदवार; विरोधी पक्षाची सहमती? भाजपाला आव्हान

President Election 2022: शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीचे उमेदवार; विरोधी पक्षाची सहमती? भाजपाला आव्हान

Next

नवी दिल्ली - देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाकडून एकच उमेदवार असावा असा प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांमध्ये सर्वात आघाडीचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आहे. पुढील २ दिवसांत विरोधी पक्षाची दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात शरद पवारांच्या नावाचा विचार झाल्यास विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार(Sharad Pawar) रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची मुंबईच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांच्या नावावर काँग्रेसही सहमत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यानंतर खरगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्याशी चर्चा केली. रविवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही शरद पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. शरद पवार यांचे विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांचे चांगले संबंध आहेत. आघाडीचं सरकार बनवण्यात पवारांचा मोठा वाटा आहे. 

महाराष्ट्रात भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यात आणि शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना करण्यात शरद पवारांचे मोठे योगदान आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ८ राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील २२ प्रमुख नेत्यांना पत्र पाठवत १५ जूनला दिल्लीत होणाऱ्या संयुक्त बैठकीचं निमंत्रण दिले आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊ शकते. या बैठकीत शरद पवारांच्या नावावर एकमत होऊ शकते असं बोललं जात आहे. 

१८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल. संविधान नियमानुसार, देशात विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्याआधीच पुढील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. आकडेवारीचं गणित लावलं तर भाजपा लोकसभा आणि राज्यसभेत मजबूत स्थितीत आहे. त्याशिवाय अनेक राज्यात भाजपाचं सरकार आहे. अशावेळी भाजपाविरोधात शरद पवारांसारख्या अनुभवी आणि मजबूत उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे. 

Web Title: President Election 2022: Sharad Pawar May be Presidential Candidate from Opposition, Challenge the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.