President Election: कोण आहेत द्रौपदी मुर्मू?; राष्ट्रपती पदासाठी NDA कडून मिळाली उमेदवारीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:31 PM2022-06-21T22:31:25+5:302022-06-21T22:32:15+5:30

देशातील पहिली आदिवासी महिला राज्यपाल असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचा कारभार २०१५ मध्ये सांभाळला होता.

President Election: Who are Draupadi Murmu ?; Opportunity for President from NDA | President Election: कोण आहेत द्रौपदी मुर्मू?; राष्ट्रपती पदासाठी NDA कडून मिळाली उमेदवारीची संधी

President Election: कोण आहेत द्रौपदी मुर्मू?; राष्ट्रपती पदासाठी NDA कडून मिळाली उमेदवारीची संधी

Next

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांना NDA कडून उमेदवारीची संधी दिली आहे. भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रपतीपदी एका महिलेला संधी मिळावी यासाठी प्रयत्न होते. देशात पहिल्यांदाच आदिवासी समुदायातील राष्ट्रपती देण्याची तयारी केली आहे. 

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
देशातील पहिली आदिवासी महिला राज्यपाल असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचा कारभार २०१५ मध्ये सांभाळला होता. 
द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक म्हणून कामाला सुरूवात करून ओडिशाच्या सिंचन विभागात नोकरी करत होत्या. 
१९९७ मध्ये द्रौपदी मुर्मू पहिल्यांदा नगरसेविका बनल्या होत्या. त्या एसटी मोर्चाच्या उपाध्यक्षा होत्या. 
२००४ मध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभेची निवडणूक लढवत यश मिळवलं होते. 
ओडिशात भाजपा अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षा, जिल्हा अध्यक्षा यासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी सांभाळल्या. भाजपा-बीजद आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून काम केले आहे. 

यशवंत सिन्हा विरोधकांचे उमेदवार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यशवंत सिन्हा यांचे नाव तृणमूल काँग्रेसनं समोर आणले होते. यशवंत सिन्हा हे चंद्रशेखर आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अर्थ मंत्री म्हणून काम केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण निर्णयात यशवंत सिन्हा यांचे योगदान आहे. यशवंत सिन्हा यांनीच संसदेत बजेट मांडण्यासाठीची वेळ संध्याकाळी ५ ऐवजी सकाळी ११ वाजता केली होती. 

याबाबत जे. पी नड्डा म्हणाले की, एनडी घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पूर्वांचल भागातून कुणी उमेदवार असावं असं ठरवलं होते. त्यात आदिवासी भागातील महिला नेतृत्व द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात येत आहे. आम्हाला अपेक्षा होती राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल परंतु विरोधकांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आधीच केले असं त्यांनी सांगितले. 

Web Title: President Election: Who are Draupadi Murmu ?; Opportunity for President from NDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.