राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी 44 जणांचा सन्मान
By admin | Published: April 13, 2017 08:28 PM2017-04-13T20:28:53+5:302017-04-13T21:46:31+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी 44 जणांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 44 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला असून, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.
या पुरस्कार विजेत्यांची नावे जानेवारीमध्ये घोषित करण्यात आली होती, त्यानुसारच त्यांना आज पुरस्कार वितरित करण्यात आले आहेत. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा पुरस्कारांनी 44 जणांचा सन्मान करण्यात आला आहे. सदगुरू जग्गी वासुदेव आणि गायक के. जे. येसूदास यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
बॉलिवूडचे शेफ संजीव कपूर, गायक कैलास खेर, बॉलिवूडचे इतिहासकार भावना सोमय्या, माजी परराष्ट्र सचिव कनवाल सिंबल, दीपा करमाकर, विकास गोवडा, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती मरियाप्पन टी आणि इतरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.