'भाजपाचा चौकार'... राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 12:29 PM2018-07-14T12:29:48+5:302018-07-14T13:03:17+5:30
राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली - राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती केली आहे. यामध्ये राम शकल, राकेश सिन्हा, रघुनाथ मोहापात्रा आ सोनल मानसिंग यांचा सहभाग आहे. हे या चारही दिग्गज अपाआपल्या क्षेत्रात माहीर आहेत. शिवाय त्यांचे त्या क्षेत्रातील योगदानही मोठे आहे. 2019 च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने चार वेगवेगळ्या राज्यातून चार जणांची निवड केली आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला होता. राष्ट्रपतीनियुक्त करत असलेल्या 12 पैकी चार जागा जागा रिकाम्या झाल्या होत्या त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज निवड केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही दिग्गज व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाही. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या चार खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते राम शकल, लेखक-स्तंभकार राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंग या दिग्गजांचा समावेश आहे. हे चार वेगवेगळ्या राज्यातील आहे. यामध्ये राम शकल उत्तरप्रदेशमधील आहेत. त्यांनी दलित वर्गासाठी मोठे काम केले आहे. राकेश सिन्हा संघ विचाराचे असून ते टिव्ही चॅनेलवर भाजपाची बाजू मांडत असतात. राकेश सिन्हा दिल्ली विद्यापिठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सोनल मानसिंह या देशातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा आहेत. ओडिशाचे शिल्पकार रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिराचे महत्वपूर्ण काम केले
The President of India has made the following four nominations to the Rajya Sabha: Farmer Leader Ram Shakal,Author and Columnist Rakesh Sinha,Sculptor Raghunath Mohapatra and Classical Dancer Sonal Mansingh pic.twitter.com/3Ex1LgUH7f
— ANI (@ANI) July 14, 2018