Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:31 AM2022-07-25T10:31:12+5:302022-07-25T10:31:40+5:30

मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केलं होतं.

president of india droupadi murmu oath ceremony west bengal partha chatterjee ed aiims mamata benarjee eknath shinde yashwant sinha | Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ

Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ

Next

द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ गेतली. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांन ऐतिहासिक विजय मिळवला. मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केलं. एकीकडे भाजपाशासित राज्यात, तसेच मुर्मूंना पाठिंपा जाहीर करणाऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये द्रौपदी मुर्मू यांना प्रचंड मतदान झालं होतं.

राष्ट्रपती भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. “ज्याचा जन्म स्वतंत्र भारतात झाला अशी मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. स्वतंत्र भारताच्या नागरिकांसोबतच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला तेजी आणायला हवी. माझा जन्म ओडिशातील एका आदिवासी गावात झाला. परंतु लोकशाहीच्या ताकदीनं मला इथवर पोहोचवलं,” असं मुर्मू म्हणाल्या.

“एका महत्त्वपूर्ण कालखंडात देशानं माझी निवड राष्ट्रपती म्हणून केली आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहोत. जेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली होती तेव्हा आपण स्वातंत्र्याची ५० व्या वर्षाचं पर्व साजरं करत होतो. आता ७५ वर्षे पूर्ण होताना मला नवी जबाबदारी मिळाली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.



कॉलेजला जाणारी पहिली मुलगी
मी माझ्या जीवनाची सुरूवात ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावापासून केली होती. मी ज्या ठिकाणाहून येते त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेणंही एका स्वप्नाप्रमाणे होतं. परंतु अनेक बाधा पार करत मी कॉलेजमध्ये जाणारी आपल्या गावातील पहिली मुलगी ठरले. एका गरीब घरातील आदिवासी क्षेत्रातील महिला आज भारताच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर पोहोचते ही आपल्या लोकशाहीची ताकद असल्याचं मुर्मू म्हणाल्या.

Web Title: president of india droupadi murmu oath ceremony west bengal partha chatterjee ed aiims mamata benarjee eknath shinde yashwant sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.