'लोकांचे राष्ट्रपती' डॉ. कलाम कायम स्मरणात राहतील - राहुल गांधी
By admin | Published: July 28, 2015 12:36 PM2015-07-28T12:36:45+5:302015-07-28T12:44:37+5:30
डॉ. कलाम हे लोकांचे राष्ट्रपती होते, त्यांचे विचार व तत्व यांच्यामुळे ते कायम जनतेच्या स्मरणात राहतील, अशा शब्दांत राहुल गांधींनी कलाम यांना आदरांजली वाहिली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - मिसाईल मॅन व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे लोकांचे राष्ट्रपती होते, त्यांचे विचार व तत्व यांच्यामुळे ते कायम जनतेच्या स्मरणात राहतील, अशा शब्दांत राहुल गांधींनी डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली.
डॉ. कलाम हे 'लोकांचे राष्ट्रपती' होते. ते जनतेच्या कायम स्मरणात राहतील. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कामात घालवले. भारताच्या आण्विक कार्यक्रमात त्यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या कार्यामुळे त्यांनी लोकांचे हृद्य व मन जिंकून घेतले होते, असेही राहुल यांनी म्हटले.
सोमवारी सायंकाळी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ८४ वर्षीय कलाम घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
आज त्यांचे पार्थिव गुवाहाटीहून दिल्लीत आणण्यात आले, त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री, संरक्षम मंत्री तसेच तिनही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. दुपारी चार नंतर सर्वसामान्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. उद्या तामिळनाडूमधील रामेश्वरम या त्यांच्या मूळ गावी कलाम यांना अखेरचा निरोप देण्यात येईल