राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती खालावली, छातीत दुखू लागल्याने, आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 02:57 PM2021-03-26T14:57:57+5:302021-03-26T14:58:40+5:30
आर्मी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीची प्रकृती स्थीर आहे.
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती शुक्रवारी खालावली. छातीत दुखू लागल्याने त्यांना आर्मी हॉस्पिटल (आरअँडआर) मध्ये भरती करण्यात आले आहे. येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे रूटीन चेकअप झाले. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत. आर्मी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींची प्रकृती स्थीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. राष्ट्रपतींच्या छातीत दुखत होते. येथे त्यांचे रुटीन चेकअप करण्यात आले. आर्मी हॉस्पिटलकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन जारी करून माहिती देण्यात आली आहे.
President Ram Nath Kovind visited Army Hospital (R&R) following chest discomfort this morning. He is undergoing routine check-up and is under observation. His condition is stable: Army Hospital (R&R)
— ANI (@ANI) March 26, 2021
(file photo) pic.twitter.com/A5hfrA3HXW
आर्मी हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये रूटीन चेकअप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याच बरोबर, राष्ट्रपती डॉक्टरांच्या देखरेखीत असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचेही सांगण्यात आले आहे.