भारतापासून हजारो मैल दूर असलेल्या या देशाच्या राष्ट्रपतींनी वेदमंत्रांचा उच्चार करून घेतली शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:13 PM2020-07-26T16:13:12+5:302020-07-26T16:16:14+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात या घटनेचा विशेष उल्लेख केला.
नवी दिल्ली - काळाच्या ओघात भारतामधून मोठ्या प्रमाणावर देशविदेशात स्थलांतर झाले आहे. दरम्यान, हे स्थलांतरीत लोक जिथे गेले तिथे त्यांनी स्थानिक संस्कृती आत्मसात केली. मात्र भारतीय संस्कृती न सोडता तिचीही जोपासना केली. अमेरिका खंडामधील एक देश असलेल्या सुरीनाममध्ये नुकतेच भारतीय वंशाचे चंद्रिका प्रसाद संतोखी हे राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. दरम्यान, राष्ट्रपतीपदावर विराजमान होताना संतोखी यांनी हातात वेद घेऊन मंत्रोच्चार करत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख केला.
यावेळी मोदी म्हणाले की, श्री चंद्रिका प्रसाद संतोखी हे सुरीनामचे नवे राष्ट्रपती बनले आहेत. ते भारताचे मित्र आहेत. २०१८ साली झालेल्या पर्सन ऑफ इंडियन ओरिजन पार्लियामेंट्री कॉन्फ्रन्समध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी शपथेची सुरुवात वेद मंत्रांच्या साक्षीने केली आणि संस्कृत भाषेत बोलले.
चंद्रिकाप्रसाद संतोखी हे प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे नेते आहेत. त्यांनी देशातील लष्करशाहा डेसी बॉउटर्स यांची जागा घेतली आहे. बॉऊटर्स यांचा नॅशनल पार्टी ऑफ सुरीनाम मे महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला होता. दरम्यान, संतोखी यांनी अशावेळी देशाच्या राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. ज्यावेळी देशाचे नेदरलँड्ससह इतर पाश्चात्य देशांशी असलेले संबंध बिघडले आहेत. तसेच देश यावेळी खूप मोठ्या संकटातून जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू
नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान