अध्यक्ष हटाव काँग्रेस बचाव
By admin | Published: September 25, 2014 11:54 PM2014-09-25T23:54:58+5:302014-09-25T23:54:58+5:30
एकीकडे विधानसभेची धामधूम सुरू असताना, व काँग्रेस स्वबळाची भाषा करीत असतांना मुरबाड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र तालुका अध्यक्ष हटाव व काँग्रेस बचाव ही मोहीम सुरू के ली आहे.
टोकावडे : एकीकडे विधानसभेची धामधूम सुरू असताना, व काँग्रेस स्वबळाची भाषा करीत असतांना मुरबाड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र तालुका अध्यक्ष हटाव व काँग्रेस बचाव ही मोहीम सुरू के ली आहे.
मुरबाड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश पवार हे निष्क्रीय असून, पक्ष वाढविण्याऐवजी ते पक्ष संपवायला निघाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे काम केले.
तसेच कार्यकर्त्यांसाठी ते वेळ देत नाहीत. पक्षाच्या मिटींग लावीत नाहीत. कार्यकर्त्यांशी अरेरावीने वागणे, कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार हा पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता करणे, असे अनेक आरोप ठेवून त्यांना हटविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात केली.
मात्र या मेळाव्याला अध्यक्ष अविनाश पवार हे आलेच नाहीत. यामुळे त्यांच्यावर पक्ष नेतृत्याने कारवाई करण्याची मागणी दशरथ टोहके, अशोक फनाडे, तुकाराम ठाकरे, अनंता घोलप, विलास भांडे, हिरामण गायकर, काकू घोलप यांचेसह सर्वच कार्यकर्त्यांनी केली असून, अध्यक्ष पवार यांना न हटविल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
(वार्ताहर)