Presidential Election 2022: जाणून घ्या, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची मोजणी कशी केली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:45 AM2022-07-21T11:45:08+5:302022-07-21T11:46:10+5:30

सर्व प्रथम मतांची छाननी करून ती क्रमवारीने लावली जाते. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी या मतपत्रिकांची छाननी करतील.

Presidential Election 2022: Know How Votes are Counted in Presidential Elections? | Presidential Election 2022: जाणून घ्या, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची मोजणी कशी केली जाते?

Presidential Election 2022: जाणून घ्या, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची मोजणी कशी केली जाते?

Next

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर २५ जुलैला देशाचे नवे राष्ट्रपती शपथ घेतील. नवे राष्ट्रपती कोण असतील याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. यासाठी दोन उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आहेत. त्याचवेळी विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. संसद भवनच्या मुख्य इमारतीत सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ६३ देण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मत मोजण्याची एक निश्चित पद्धत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

सर्व प्रथम मतांची छाननी करून ती क्रमवारीने लावली जाते. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी, राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी या मतपत्रिकांची छाननी करतील. बॅलेट पेपरमध्ये खासदार त्यांच्या पसंतीनुसार उमेदवारांना मतदान करतात. यासाठी ते हिरवे पेन वापरतात. याउलट आमदार गुलाबी पेनाचा वापर करतात. अशा प्रकारे, द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्या बाजूने पडलेली मते वेगळी केली जातील.

दोन स्वतंत्र ट्रे 
मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र ट्रे ठेवण्यात आले आहेत. यातील एक एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी आहे. विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी दुसरी ट्रे आहे. खासदारांपूर्वी आमदारांच्या मतपत्रिका क्रमाने लावल्या जातील. मुर्मू यांचे नाव असलेली मतपत्रिका त्या ट्रेमध्ये ठेवली जाईल. तर यशवंत सिन्हा यांना पसंती दिली असती तर त्यांना दुसऱ्या ट्रेमध्ये स्थान मिळेल. प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचे मूल्य ठरलेले असते. खासदाराच्या मताचे मूल्य ७०० आहे. त्याच वेळी, आमदाराच्या मताचे मूल्य त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.

मतमोजणीनंतर ट्रेंड येण्यास सुरुवात 
मतपत्रिकांची क्रमवारी लावल्यानंतरच मतांची मोजणी केली जाते. संसदेतील खोली क्रमांक ७३ बाहेर मीडिया स्टँड बनवण्यात आला आहे. मतमोजणी सुरू होताच कल कळविला जाईल. हे समजून घ्यायला हवं की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार हा विजयी नसतो. मात्र, ठराविक कोट्यापेक्षा जास्त मते मिळविणारा विजयी आहे. प्रत्येक उमेदवाराचा कोटा टाकलेल्या मतांची बेरीज करून, दोनने भागून आणि त्यात '१' जोडून कोटा निश्चित केला जातो. या मूल्यापेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरतो. संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Presidential Election 2022: Know How Votes are Counted in Presidential Elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.