Presidential Election 2022: 18 जुलैला होणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, 21 जुलै रोजी भारताला मिळणार नवे राष्ट्रपती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:49 PM2022-06-09T15:49:49+5:302022-06-09T15:49:55+5:30
Presidential Election 2022: भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे.
Presidential Election 2022: अनेक दिवसांपासून ज्याची उत्सुकता लागली होती, त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून, 21 जुलै रोही देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद निवडणुकीची घोषणा केली. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.
Voting for Presidential elections to be held on 18th July, counting of votes on 21st July: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/bTvawdiE9I
— ANI (@ANI) June 9, 2022
'...तर मतदान रद्द होणार'
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निवडणुकीत मतदानासाठी विशेष शाई पेन देण्यात येणार आहे. मतदान करण्यासाठी 1,2,3 अशा पर्यायांची निवड करावी लागेल. पहिली पसंती न दिल्यास, मतदान रद्द केले जाईल.'
Presidential poll | The value of the vote of an MP will be 700. Those in preventive detention can vote and those in jail will have to apply for parole and if they get parole, they can vote: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/NvjrGFLO1c
— ANI (@ANI) June 9, 2022
खासदाराच्या मतांचे मूल्य किती?
'या काळात राजकीय पक्ष व्हीप जारी करू शकत नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होणार असून, राज्यसभेचे महासचिव हे निवडणूक प्रभारी असतील. याशिवाय कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत खासदाराच्या मतांचे मूल्य 700 असेल. यासोबतच तुरुंगात असलेले प्रतिनिधी मतदान करू शकतात, त्यांना पॅरोलसाठी अर्ज करावा. 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 4,809 मतदार मतदान करणार आहेत,' अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
संबंधित बातमी- कशी होते राष्ट्रपतींची निवडणूक? खासदार-आमदारांच्या मतांचे मूल्य काय? असे आहे गणित...
कोण मतदान करू शकतात?
17 जुलै 2017 रोजी शेवटची राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती. तेव्हा जवळपास 50 टक्के मते एनडीएच्या बाजूने पडली होती. एकूण 4,880 मतदारांपैकी 4,109 आमदार आणि 771 खासदारांनी मतदान केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग नसतो. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी यात मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या मतांच्या किमतीचे गणित वेगळे असते. सर्व प्रथम, सर्व राज्यांच्या विधानसभाच्या आमदारांच्या मतांचे मूल्य जोडले जाते. या एकत्रित मूल्याला राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येने भागले जाते. अशा प्रकारे मिळालेली संख्या ही खासदाराच्या मताचे मूल्य असते.