राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर, १८ जुलै रोजी मतदान, या महिन्यात भाजप करणार उमेदवार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:43 AM2022-06-10T08:43:11+5:302022-06-10T08:43:28+5:30

Presidential election : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नसल्याने हा केंद्रशासित प्रदेश निवडणुकीत प्रक्रियेत नाही. राज्यसभेतही जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधी नाहीत. 

Presidential election announced, polls on July 18, BJP announces candidates in third week of June | राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर, १८ जुलै रोजी मतदान, या महिन्यात भाजप करणार उमेदवार घोषित

राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर, १८ जुलै रोजी मतदान, या महिन्यात भाजप करणार उमेदवार घोषित

googlenewsNext

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या घोषित केलेल्या निवडणूक वेळापत्रकासोबत नवीन राष्ट्रपतींची निवड करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार असून, मतमोजणी २१ जुलै रोजी होईल. 
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार चार राज्यांतील राज्यसभेच्या १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक आणि लोकसभेच्या दोन जागांसोबत काही राज्यांतील विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नसल्याने हा केंद्रशासित प्रदेश निवडणुकीत प्रक्रियेत नाही. राज्यसभेतही जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधी नाहीत. 

यांना करता नाही येणार मतदान
राज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभा किंवा विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. विशेष म्हणजे, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साह यांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला नसल्याने ते मतदान करतील. 

काँग्रेसमध्ये  हालचाली नाहीत 
राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक घोषित झाली असताना सत्तारुढ किंवा काँग्रेसमध्ये उमेदवाराची निवड करण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली दिसत नाही. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही एकजुटीअभावी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे पुढाकार घेण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या जोरदार हालचाली
भाजपने रालोआतील घटक पक्षांशी समन्वय करण्यास शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांना नियुक्त केले. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार भाजप जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ठरवील.

(विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे.)

Web Title: Presidential election announced, polls on July 18, BJP announces candidates in third week of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.