राष्ट्रपती निवडणूक : कोविंद यांचे पारडे जड, मतांचे गणित ‘रालोआ’ उमेदवाराच्या बाजूने

By admin | Published: June 26, 2017 01:12 AM2017-06-26T01:12:10+5:302017-06-26T01:12:10+5:30

राष्ट्रपतीपदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद ६२ टक्क्यांहून अधिक मतांसह सहजपणे निवडून येऊ शकतात.

Presidential elections: Kovind's parade heavy, votes of votes 'Niroa' in favor of the candidate | राष्ट्रपती निवडणूक : कोविंद यांचे पारडे जड, मतांचे गणित ‘रालोआ’ उमेदवाराच्या बाजूने

राष्ट्रपती निवडणूक : कोविंद यांचे पारडे जड, मतांचे गणित ‘रालोआ’ उमेदवाराच्या बाजूने

Next

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद ६२ टक्क्यांहून अधिक मतांसह सहजपणे निवडून येऊ शकतात. तथापि, त्यांच्या मतांची टक्केवारी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना २०१२ मध्ये मिळालेल्या ६९ टक्के मतांहून कमी असेल.
राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदाच दलित विरुद्ध दलित अशी लढाई होत आहे. आकडे भाजपच्या बाजूने असून, त्यांच्या उमेदवाराला जवळपास सात लाख मते मिळू शकतात. ही संख्या १० लाख ९८ हजार ९०३ मतांच्या सुमारे दोन तृतीयांश आहे.
काही अपक्ष, आम आदमी पार्टी, लोकदल, एमआयएमआयएमसारख्या पक्षांनी अद्याप पत्ते उघड केले नाहीत. त्यांच्याकडे जवळपास ३९ हजार ९६५ मते आहेत. हा गट कोणाकडे जाईल हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी उमेदवाराच्या प्रचार मोहिमेवर अवलंबून राहील. कोविंद यांना एकूण ७७६ खासदारांपैकी ५२४ खासदारांचा पाठिंबा असून, यातील ३३७ खासदार भाजपचे आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांना २३५ खासदारांचा पाठिंबा आहे. रालोआ उमेदवाराला खासदारांच्या मताच्या रुपाने ३ लाख ७० हजार ९९२ मते मिळतील. तर उर्वरित ३ लाख ११ हजार ६८५ मते त्यांना आमदारांची मिळतील. मीरा कुमार यांना खासदारांच्या रुपाने १ लाख ६६ हजार ३८० मते मिळतील. २ लाख ९ हजार ८८१ मते राज्यांतील आमदारांकडून मिळतील.
उत्तर प्रदेशातून प्रचाराची सुुरुवात
रामनाथ कोविंद यांनी रविवारी उत्तरप्रदेशात लखनौमधून आपल्या प्रचाराची आणि देशव्यापी दौऱ्याची सुरुवात केली. राज्यातील भाजप खासदार आणि आमदारांची त्यांनी भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांच्यासोबत कोविंद हे विमानतळावरुन थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. कालीदास मार्ग येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोविंद यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह, नितीन गडकरी, उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्याशी चर्चा केली. विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
विवेकाने मतदान करा - मीरा कुमार
राष्ट्रपतीपदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रविवारी या निवडणुकीत मतदार असलेल्या सर्व आमदार खासदारांना आपल्या सद्सद््विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असे आवाहन केले. संसदेच्या आणि राज्य विधिमंडळांच्या सदस्यांनी उद्देशून लिहिलेल्या पत्रात मीरा कुमार म्हणतात: एक इतिहास घडविणाची तुम्हाला संधी आहे. या पवित्र कामासाठी आपण मनाने व कृतीने एकजूट दाखवू या. प्रत्येकाने आपल्या मनाच्या आतील आवाजाला साद देऊन देशाला दिशा दाखविण्याची हिच वेळ आहे. त्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवार, दि.२८ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मीरा कुमार यांच्या ‘योग्यते’वर स्वराज यांचा ‘व्हिडीओ हल्ला’
मीरा कुमार याआधी लोकसभेच्या अध्यक्ष असताना त्यांनी विरोधी पक्षांना कशी वागणूक दिली हे दाखवून एकप्रकारे त्यांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी परराराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी चार वर्षांपूर्वीच्या आपल्या एका भाषणाचे व्हिडिओ चित्रिकरण प्रसिद्ध केले. सन २०१३ मध्ये आपण लोकसभेत केलेल्या सहा मिनिटांच्या भाषणात त्यावेळच्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी कसे ६० वेळा अडथळे आणले हे दाखविणारा व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून ‘लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी विरोधी पक्षनेत्यास कशी वागणूक दिली ते पाहा’ असे भाष्यही केले.

Web Title: Presidential elections: Kovind's parade heavy, votes of votes 'Niroa' in favor of the candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.