Presidential Election 2022: शिवसेना गेली, पण तिसऱ्या बड्या पक्षाचे यशवंत सिन्हांना समर्थन मिळाले; राष्ट्रपती निवडणूक चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 02:52 PM2022-07-16T14:52:09+5:302022-07-16T14:53:14+5:30

Presidential Election 2022 Update: भाजपा, काँग्रेसनंतर दोन राज्यांत बहुमतात सत्ता असणाऱ्या तिसऱ्या पक्षाने अखेरच्या क्षणी पत्ते खोलले. 

Presidential polls: AAP announces support for Opposition candidate Yashwant Sinha after Shivsena Gone with BJP | Presidential Election 2022: शिवसेना गेली, पण तिसऱ्या बड्या पक्षाचे यशवंत सिन्हांना समर्थन मिळाले; राष्ट्रपती निवडणूक चुरशीची

Presidential Election 2022: शिवसेना गेली, पण तिसऱ्या बड्या पक्षाचे यशवंत सिन्हांना समर्थन मिळाले; राष्ट्रपती निवडणूक चुरशीची

googlenewsNext

राष्ट्रपतीपदाची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. कालपर्यंत भाजप विरोधात असलेल्या शिवसेनेने राजकीय वादळानंतर अचानक भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एकीकडे जिंकण्याएवढे बहुमत नसलेल्या भाजपाच्या उमेदवाराचे पारडे जड होत असताना आता विरोधकांच्या बाजुने आपनेआपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

भाजपाकडे राष्ट्रपती उमेदवार जिंकण्य़ाएवढी मते नव्हती. तर विरोधकांकडे जिंकण्याएवढी मते असली तरी एकमत नव्हते. याचा फायदा भाजपाला होताना दिसत आहे. त्यातच गेली अडीच वर्षे भाजपाविरोधात असलेली शिवसेना पुरती हतबल झालेली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर खासदारांनीदेखील मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. यामुळे शिवसेनेने अखेर भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

अरविंद केजरिवाल यांच्या आपने दिल्ली आणि पंजाबची ताकद युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामागे उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपच्या पॉलिटिकल अफेअर कमिटीच्या बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. 

आप हा असा पक्ष आहे, जो काँग्रेस आणि भाजपानंतर दोन राज्यांत सत्ता असलेला तिसरा पक्ष आहे. याचबरोबर दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता आहे. यामुळे या दोन्ही राज्यांची बहुतांश मते ही सिन्हा यांना मिळणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमदार आणि खासदार हे मतदान करतात. २१ जुलैला निकाल जाहीर होणार आहे. २५ जुलैला भारताचे नवे राष्ट्रपती शपथ घेतील. 

Web Title: Presidential polls: AAP announces support for Opposition candidate Yashwant Sinha after Shivsena Gone with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.