Narendra Modi: पंजाबात राष्ट्रपती राजवट? राजकीय वर्तुळात लढवला जातोय तर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:42 AM2022-01-06T05:42:30+5:302022-01-06T05:42:43+5:30
पंजाबमध्ये भाजप हा काही मुख्य पक्ष नाही. प्रश्न असे आहेत की, या घटनेनंतर मोदी किती सभा घेऊ शकतील? विधानसभा निवडणूक होणार असलेल्या इतर राज्यांवरही याचा परिणाम होईल का? कणखर नेते या मोदी यांच्या प्रतिमेला धक्का लागेल का?
- व्यंकटेश केसरी
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत परतलो’ या वक्तव्यानंतर पंजाबात राष्ट्रपती राजवट लावण्याचा पर्याय केंद्रासमोर असू शकतो, असा तर्क राजकीय वर्तुळात आहे.
भाजपने मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला आहे. त्यातून असे संकेत आहेत की, काँग्रेस राजवटीत विधानसभा निवडणूक खुल्या आणि निर्भय वातावरणात घेतली जाऊ शकणार नाही. खरा धोका हा शेतकऱ्यांकडून आहे कारण वादग्रस्त ठरलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर त्यांंनीच आंदोलन केले होते.
पंजाबमध्ये भाजप हा काही मुख्य पक्ष नाही. प्रश्न असे आहेत की, या घटनेनंतर मोदी किती सभा घेऊ शकतील? विधानसभा निवडणूक होणार असलेल्या इतर राज्यांवरही याचा परिणाम होईल का? कणखर नेते या मोदी यांच्या प्रतिमेला धक्का लागेल का?
‘गर्दी न जमल्याने मोदींची सभा रद्द’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या आरोपाचा इन्कार करीत काँग्रेसने म्हटले, गर्दी न जमल्यामुळे मोदींची सभा रद्द करण्यात आली.
मोदी हेलिकॉप्टरद्वारे सभेच्या ठिकाणी जाणार होते. त्यांनी अचानक रस्त्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐनवेळी रस्त्यावर १० हजार पोलीस तैनात केले. असे असतानाही शेतकरी या मार्गावर अचानक दाखल झाले. त्यांना हटविण्यास वेळ लागला.