महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; १४ जणांना शौर्य पदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:51 IST2020-08-15T06:16:22+5:302020-08-15T06:51:20+5:30
पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, १४ जणांना पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; १४ जणांना शौर्य पदक
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना विविध श्रेणीतील पुरस्कार व राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, १४ जणांना पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाले आहे. देशभरातून २१५ पोलीस कर्मचाºयांना शौर्य तर अतुलनीय सेवेसाठी ८० अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जाईल. गुणवंत सेवेसाठी ६३१ जणांना यंदा निवडण्यात आले आहे.