जिल्ातील तिघांना राष्ट्रपती पदक जाहीर
By Admin | Published: August 15, 2016 12:50 AM2016-08-15T00:50:29+5:302016-08-15T00:50:29+5:30
जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पो.स्टे), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून रविवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले.
ज गाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पो.स्टे), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून रविवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले.देवरे यांना ३७ वर्षाच्या सेवेत २९७ बक्षीसे मिळाली आहेत. २००७ मध्ये पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाले आहे. ६० घरफोड्या उघडकीस आणल्या असून सहाशेच्यावर गुन्ांचा तपास पूर्ण केला आहे. खूनाच्या पाच गुन्ात आरोपींना शिक्षा झालेली आहे. वानखेडे यांना ३२ वर्षाच्या कालखंडात ४३४ बक्षीसे व पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले आहे. खून, दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.खंडाळा येथे प्रक्षिणास असताना भिवंडी येथे उसळलेल्या जातीय दंगलीत जीवाची पर्वा न करता झोपड्यांमधून नागरीकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले होते.बडगुजर यांना २९ वर्षाच्या सेवेत २९१ बक्षीसे मिळाली आहेत. पोलीस महासंचालकांचेही पदक प्राप्त झाले आहे. २००६ या वर्षी अतिवृष्टीमुळे शहरातील मिल्लत शाळेला पाण्याचा वेढा पडला होता, तेव्हा जीवाची पर्वा न करता त्यांनी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला होता. २०१५ मध्ये कुंभमेळा येथे असताना ८ बॉम्ब कॉल आले होते, तेव्हा यशस्वीरित्या ही जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रपती पदकाची यादी जाहीर होताच पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी तिन्ही कर्मचार्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, या तिन्ही कर्मचार्यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव केला जाणार आहे.