राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 02:06 PM2019-01-25T14:06:54+5:302019-01-25T14:12:16+5:30
राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
नवी दिल्ली - राष्टपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रपती पोलिस पदक पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली असून राज्यातील 44 पोलिसांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्टपती पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरीत 40 पोलिसांना पोलीस पदक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्राला एकूण 44 पुरस्कार मिळाले आहेत. राष्टपती पुरस्कृत जीवन रक्षा पदक 48 बहादूर पोलिसांना देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी दोन पोलीस अधिकाऱ्यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, दोन पोलीस अधिकाऱ्यांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि एकास जीवन रक्षा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.
President Police Medal announced : #Maharashtra gets 4 Presidents Police Medal for distinguished service & 40 Police Medal for Meritorious service.#PoliceMedal#RepublicDay2019pic.twitter.com/pQDPgrKjiG
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) January 25, 2019
Jeevan Raksha Padak announced : 48 persons gets the #JeevanRakshaPadak series of awards . Maharashtra gets 2 #SarvottamJeevanRakshaPadak posthumously and 2 persons gets #UttamJeevanRakshaPadak and 1 person gets Jeevan Raksha padak. #RepublicDay2019pic.twitter.com/Fvy9wkskUB
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) January 25, 2019